Ganesh Chaturthi 2023 : डिचोलीत निर्माल्याची समस्या कायम- कृत्रिम तळ्याची योजना यशस्वी

गृहनिर्माण मंडळाच्या वसाहतीत ''कृत्रिम तळ्यात'' गणपती विसर्जनाची संकल्पना यशस्वी ठरली. यंदाही या तळ्यात गणपती मूर्तींचे विसर्जनही करण्यात आले.
Water Pollution Due to Nirmalya At Bicholim
Water Pollution Due to Nirmalya At BicholimDainik Gomantak

Ganesh Chaturthi 2023 : डिचोली डिचोलीतील बहुतेक भागात विसर्जनस्थळी निर्माल्य जमा करण्यासाठी कोणतीच उपाययोजना नसल्याने यंदाही विशेष करून ग्रामीण भागात निर्माल्य विल्हेवाटीची समस्या निर्माण झाली. परंतु

कृत्रिम तळ्याची योजनेला यश आले, त्या ठिकाणी निर्माल्याची व्यवस्था उत्तम होती. डिचोलीतील नदी, तळ्याच्या ठिकाणी डिचोलीतील दीड, पाच आणि सात दिवसांच्या गणपती ''बाप्पा''चे उत्साही वातावरणात विसर्जन करण्यात आले आहे.

तरी काही भागात यंदाही निर्माल्याच्या विल्हेवाटीची समस्या निर्माण झाली. बहुतेक भागात विसर्जनस्थळी निर्माल्य जमा करण्यासाठी ''निर्माल्य कुंभ'' आदी कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे गणपती मूर्तींचे विसर्जन करतानाच गणेशभक्तांनी निर्माल्य पाण्यात सोडले आहे.

नदीत सोडलेले निर्माल्य पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले. मात्र काही ठिकाणी तलाव, ओहोळ याठिकाणी मात्र हे निर्माल्य अडकून राहिल्याचे दिसून येत आहे.

गृहनिर्माण मंडळाच्या वसाहतीत ''कृत्रिम तळ्यात'' गणपती विसर्जनाची संकल्पना यशस्वी ठरली. यंदाही या तळ्यात गणपती मूर्तींचे विसर्जनही करण्यात आले.

विसर्जनस्थळी जमा झालेल्या निर्माल्याची व्यवस्थित विल्हेवाट लावण्यात आल्याने या कृत्रिम तळ्याच्या ठिकाणी निर्माल्याची कोणतीच समस्या निर्माण झालेली नाही.

दुसऱ्याबाजूने तळ्यात विसर्जित केलेल्या गणेश मूर्ती पूर्णपणे विरघळल्यानंतर आतिल चिकण माती बाहेर काढून ही माती रिसायकलिंग करून पुन्हा वापरात आणण्यात येणार आहे.

Water Pollution Due to Nirmalya At Bicholim
Goa Tourism: शाश्‍‍वत हरित पर्यटनाला देणार प्राधान्‍य : खंवटे

निर्माल्याचा वापर झाडांसाठी गृहनिर्माण वसाहतीतील गणेशभक्तांची गणेश विसर्जनावेळी होणारी अडचण लक्षात घेऊन गणेशभक्तांच्या सहकार्यातून वसाहतीतील कृत्रिम तळ्यात मूर्ती विसर्जित करताना कोणतेही प्रदूषण होणार नाही. त्याची गणेशभक्तांनी पूर्णपणे दक्षता घेतली होती.

निर्माल्य तळ्यात न सोडता हे निर्माल्य गृहनिर्माण वसाहतीतील झाडांना वापरले आहे. या निर्माल्यापासून झाडांना सेंद्रिय खत मिळणार असल्याचा दावा गणेशभक्तांनी केला आहे. गृहनिर्माण वसाहतीतील गणेशभक्तांची गणेश विसर्जनावेळी होणारी अडचण लक्षात घेऊन गणेशभक्तांच्या सहकार्यातून वसाहतीतील कृत्रिम तळ्यात मूर्ती विसर्जित करताना कोणतेही प्रदूषण होणार नाही. त्याची गणेशभक्तांनी पूर्णपणे दक्षता घेतली होती.

निर्माल्य तळ्यात न सोडता हे निर्माल्य गृहनिर्माण वसाहतीतील झाडांना वापरले आहे. या निर्माल्यापासून झाडांना सेंद्रिय खत मिळणार असल्याचा दावा गणेशभक्तांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com