Bicholim Bus Stand : डिचोली कदंब बसस्थानक वर्षभरात होणार खुले : शेट्ये

Bicholim Bus Stand : तांत्रिक कारणामुळे पावसाळ्यात कामात व्यत्यय आला असला तरी सध्या सुरू असलेल्या कामाबाबत शेट्ये यांनी समाधानही व्यक्त केले.
Bicholim Bus Stand
Bicholim Bus Stand Dainik Gomantak

Bicholim Bus Stand : डिचोली, येथील ''कदंब'' बसस्थानक संबंधी तांत्रिक प्रश्न लवकरच जाग्यावर घालण्यात येतील. पुढील वर्षात हे बसस्थानक खुले होईल, असा विश्वास आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी व्यक्त केला.

सुमारे १६.५ कोटी खर्च करून साधनसुविधा विकास महामंडळातर्फे बसस्थानक प्रकल्प उभारण्यात येत आहे. बुधवारी शेट्ये यांनी या प्रकल्पाची पाहणी केली.

तांत्रिक कारणामुळे पावसाळ्यात कामात व्यत्यय आला असला तरी सध्या सुरू असलेल्या कामाबाबत शेट्ये यांनी समाधानही व्यक्त केले.

यावेळी कदंब वाहतूक महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय घाटे, वाहतूक खात्याचे सहायक संचालक राजेश नाईक, नगराध्यक्ष कुंदन फळारी, मुख्याधिकारी सचिन देसाई, नगरसेवक ॲड. अपर्णा फोगेरी आदी उपस्थित होते.

Bicholim Bus Stand
Goa River Issue: ‘पार’ नदीला प्रदूषणाचा विळखा

'आरटीओ' कार्यालय पहिल्या मजल्यावर

या बसस्थानक प्रकल्पाच्या दुसऱ्या मजल्यावर वाहतूक (आरटीओ) कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव होता, परंतु जनतेची गैरसोय टाळण्यासाठी हे कार्यालय पहिल्या मजल्यावर आणण्याचा प्रस्ताव आहे, असे आमदार शेट्ये यांनी सांगितले.

''आरटीओ''शी संबंधित कामकाजासाठी दरदिवशी येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असते. या नागरिकांना त्रास होता कामा नये. त्यासाठी हे कार्यालय सोईस्कर अशा जागेत कार्यरत करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

पार्किंगसाठी जागा मागणार

बसस्थानक परिसरात पार्किंगची समस्या उद्भवू नये, यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. बगलमार्ग रुंदीकरणासाठी बसस्थानकाजवळ संपादित करण्यात आलेली जागा पार्किंगसाठी सोडवण्यात यावी, यासाठी प्रयत्न करण्यात येत असून बगलमार्ग रुंदीकरणासाठी दुसऱ्या बाजूने जागा संपादित करावी, अशी येथील नागरिकांची अपेक्षा आहे.

याबाबत आपण लवकरच सरकारकडे प्रस्ताव मांडणार आहे. तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेउन त्यांच्या समोर ही मागणी ठेवणार आहे. मुख्यमंत्री पूर्ण सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे, असे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी यावेळी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com