Bori News : छत्रपती शिवाजी महाराजांमुळे गोव्यात धर्मांतराला आळा बसला : सचिन मदगे

Bori News :छत्रपतींच्या जीवन व कार्यावर व्याख्यान
Bori
Bori Dainik Gomantak

Bori News : बोरी, छत्रपती शिवाजी महाराजांचा दरारा आणि धाक यामुळ गोव्यातील कित्येक तालुक्यात पोर्तुगीजां‌कडून होणाऱ्या धर्मांतराला आळा बसला, असे प्रतिपादन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे अभ्यासक व प्रसारक सचिन मदगे यांनी केले.

बोरीच्या स्वामी विवेकानंद विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन व कार्य‌ या विषयावर ते बोलत होते.पोर्तुगीजांचे साडेचारशे वर्षे राज्य होते असे म्हटले तरी गोव्यातील केवळ चार तालुके बार्देश, तिसवाडी, मुरगाव आणि सासष्टी या पुरतेच ते मर्यादित होते हे सत्य आहे. कारण उर्वरित सगळे तालुके हे साधारण २०० ते २५० वर्षेच पोर्तुगीजांच्या ताब्यात राहू शकले.

गोव्याला मुक्त करण्याच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांनी जोरदार प्रयत्न केले. छत्रपतींची सेना फोंड्यापर्यंत मजल मारून गेली. सप्तकोटेश्वर मंदिराची पुनर्स्थापना शिवाजी महाराजांनी केली. फोंड्यातील मर्दनगड हा संभाजी राजांनी बांधला.

हा सगळा इतिहास विचारात घेतला तर गोव्यातील तरुण पिढीला निश्चितच जाणीव होईल की गोवा आणि त्यांचे अत्यंत जवळचे नाते होते. छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर कदाचित गोव्यात धर्मांतराचा वेग प्रचंड प्रमाणात वाढला असता. महाराजांमुळे मोगल तसेच अन्य बाहेरील शक्तींचा बिमोड झाला.

Bori
Sunburn Festival Goa 2023: सलग तिसऱ्या दिवशीही सनबर्नमध्ये चोरट्यांचा डल्ला; तब्बल 80हून अधिक मोबाईल फोन 'गायब'

कैक वर्षानंतर जवळजवळ सहाशे वर्षानंतर खऱ्या अर्थानं हिंदू साम्राज्य स्थापन करण्याचे श्रेय शिवाजी महाराजांना जाते. शिवाजी महाराज नसते तर कदाचित आपला संपूर्ण देश सनातन संस्कृतीपासून दूर गेला असता.

असेही त्यांनी सांगितले. संस्थेचे सचिव रत्नाकर देसाई यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर मुख्याध्यापिका कल्पना बेहेरे यांनी आभार मानले.

रायगडातील संस्थेच्या स्पर्धेत सहभागी व्हा

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, रायगड या संस्थेतर्फे महाराजांच्या कार्याची जाणीव प्रत्येक विद्यार्थ्याला व्हावी म्हणून त्यांच्या जीवन आणि कार्य यावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केल्या जातात, त्या स्पर्धेची माहिती त्यांनी यानिमित्ताने दिली.

गोव्यातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन सचिन मदगे यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com