तीन राज्यातील तब्बल 146 भात जातींचे संवर्धन करणारा अवलिया- डॉ .के मनोहर 

manohar 2.jpg
manohar 2.jpg

मध्यम उंची, ठासून भरलेला बांधा , पिढीजात दक्षिणात्य काळा वर्ण, मातीत मळलेली मातकट कपडे ,चिखलातले बूट, शर्टाच्या कॉलरला अडकवलेली यू-टर्न दांड्याची काळी छत्री हे वर्णन ऐकल्यावर आपल्या तो शेतमजूर किंवा अल्पभूधारक शेतकरी (Farmer) असेल असा वाटेल. या वर्णनाची व्यक्ती शास्त्रज्ञ असू शकते असे म्हटले तर ते आपल्या पचनी पडत नाही. पण हे आहेत, गोव्याच्या (Goa) केंद्रीय किनारी शेती संस्थेतील अनुवंशीक वनस्पती शास्त्रज्ञ डॉ.के. मनोहर (k.manohar) त्यांनी विविध प्रकारच्या भाताच्या हायब्रीड जाती शोधले आहेत.

पण त्यांची सर्वात महत्त्वाची मोठी ओळख म्हणजे गोवा (Goa), महाराष्ट्र(maharashtra) आणि कर्नाटकातील (karnataka) सुमारे 146  भाताच्या जाती गोळा करून त्या जतन करण्याचा अवघड काम ते 11- 12 वर्षे निरंतर करत आहेत. कारण प्रत्येक वर्षी या सर्व प्रकारच्या जाती जमिनीत लावल्या जातात. त्या वाढवल्या जातात. आणि त्यांची काढणी, कापणी आणि मळणी करून परत संवर्धन संरक्षित केल्या जातात. भारतीय कृषी क्षेत्रासाठी त्याचे हे भरीव योगदान मानावे लागले. (Avaliya  Dr K Manohar who cultivates 146 rice varieties in three states)

पश्चीम किनारपट्टीवरील महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक यांचा भौगोलिक भूभाग सारखाच आहे. किनारपट्टी ,सकल- सपाट प्रदेश आणि पश्चिम घाटातील डोंगराळ भाग. या तिन्ही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या भाताची लागवड केली जाते. आणि त्यांचे उत्पादन घेतले जाते. काही जाती पारंपारिक आहेत तर काही प्रजाती आहेत . शिवाय त्या प्रदेशनिष्ठ म्हणजे इंडेमिक आहेत. म्हणजेच त्या केवळ त्याच भागात मिळतात . त्यामुळे त्या त्या भागांमध्ये फिरून या पारंपारिक आणि मूळ स्वरूपातील भात जाती शोधून काढून त्या संरक्षणाचं काम अवघड आहे.

वातावरणातील बदल ,ग्लोबल वार्निंग ,योग्य संवर्धनाचा अभाव यामुळे गेल्या 40 वर्षात भारतातील 10 हजार भाताच्या जाती नष्ट झाल्या असून हा वेग असाच राहिला तर देशी भाताच्या अनेक जाती आपण कायमच्या गमवून बसू . यासाठी भाताच्या सध्या अस्तित्वात असलेल्या जातींचे जतन महत्वाचे आहे .
या जातीचे जतन  गोव्यात जतन केलेल्या भाताच्या जातींमध्ये गोव्यातल्या आजगो, कुरगुट, सिड्डओ कर्नाटकामधील कग्गा , जडबत्ता, खाराबत्ता , गुडदाणी, शिमिगो, मैसूर सन्ना महाराष्ट्रातील खारेमुणगे , खारारट्टा, बुरारट्टा, जिरगा, मुरगोडी या जातींचा समावेश आहे.

 गोवा धान 1,2,3,4 चे जनक 

खाजन शेती पूरक ,योग्य अशा गोवा धान 1234 या चारीही भाताच्या जाती डॉ मनोहर यांनी शोधून काढल्या आहेत.  यासाठी कोरगुट, जया, ज्योती यांचा संकर केला आहे 

भारतातील 10 हजार जाती कायमच्या नष्ट 

जगभरात सुमारे 40 हजार भाताच्या जाती होत्या. त्यापैकी विविध कारणांनी 24 हजार जाती कायमच्या नष्ट झाल्या आहेत. भारतात सुमारे 16 हजार स्थानिक भाताच्या जाती होत्या त्यापैकी 10-11 हजार जाती नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे उरलेल्या जातींचे संवर्धन करणे हे मानवी जाती समोरचे लक्ष्य असायला हवे. भारतातही भाताच्या हजारो जाती होत्या मात्र आता त्या साडेतीनशेच्या आसपास उरली आहेत. यासाठी ठिकठिकाणी संशोधन सुरू आहे. यामध्ये फिलीपाईन्स येथील आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मात्र या संस्थेसाठीही मूळ जाती आवश्यक असतात. मूळ जाती मध्ये चांगली  रोगप्रतिकार शक्ती असते.

विविध वातावरणात उत्पन्न देण्याची क्षमता आणि प्रतिकूल वातावरणातही टिकून राहण्याची गुणवत्ता या मूळ जातींमध्ये मोठ्या प्रमाणात असते. काही जातींमध्ये वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्ये असतात काही जाती उंच उगवणाऱ्या तर काही जाती छोट्या उंचीच्या असतात उत्पादनाची कालखंडही वेगवेगळा असतो त्यामुळे यातूनच हायब्रीड जातींचा जन्म होतो आणि त्या गुणवत्तापूर्ण भरघोस उत्पादन देणाऱ्या आणि विविध प्रकारच्या किडीला विरोध करणार्‍या असतात.

शेती संशोधनाच्या कामांमध्ये मूळ जाती प्रजाती खूपच महत्त्वाचे असतात त्यांच्या आधारावर भविष्यातील संशोधन घेतले असते म्हणून अशा प्रकारचे संरक्षण आणि संवर्धन फायद्याचे आणि महत्त्वाचे भूमिका बजावते असं मत केंद्रीय किनारी शेती संशोधन संस्थाचे संचालक डॉ. प्रवीण कुमार  यांनी मांडले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com