Parra News : होंड्यात खगोलप्रेमींनी लुटला चंद्रग्रहण दर्शनाचा आनंद

त्याला खगोलप्रेमी आणि स्थानिकांनी भरपूर प्रतिसाद देऊन दुर्बिणीतून चंद्र ग्रहण पाहण्याचा आनंद लुटला.
Person watching lunar eclipse
Person watching lunar eclipseDainik Gomantak

Parra News : पर्ये, होंडा सत्तरी येथील आजोबा नगर - कनकीचे मळ येथे खगोलप्रेमींनी चंद्र ग्रहण पाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. शनिवारी रात्री चंद्र ग्रहणाच्या निमित्ताने याचे आयोजन केले होते. त्याला खगोलप्रेमी आणि स्थानिकांनी भरपूर प्रतिसाद देऊन दुर्बिणीतून चंद्र ग्रहण पाहण्याचा आनंद लुटला.

काल रात्री पहाटे १ ते सव्वा दोन या वेळेत हे अर्ध चंद्रग्रहण झाले. हे चंद्रग्रहण सर्व सामान्य जनता आणि खगोलप्रेमींना पाहण्याची संधी उपलब्ध व्हावी, म्हणून होंडा येथील खगोलशास्त्र अभ्यासक गौतम जल्मी यांनी ''चांद-सूर्या'' उपक्रमाअंतर्गत हे चंद्रग्रहण पाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.

दरम्यान या कार्यक्रमाला गोवा आणि महाराष्ट्रातील विविध भागातील खगोलप्रेमी आणि होंडा, साखळी आदी भागातील नागरिक तथा स्थानिकांनी उपस्थिती राहून याचे दर्शन केले. यावेळी गौतम जल्मी यांनी आकाशातील विविध घडामोडींची माहिती दिली.

गैरसमज दूर होताहेत ! गौतम जल्मी यांनी उपस्थितांना चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाबाबत माहिती देऊन सांगितले,की ग्रहण म्हणजे चंद्र आणि पृथ्वी यांच्या एकमेकांवर पडणाऱ्या सावल्यांचा खेळ आहे. सूर्य पृथ्वी व चंद्र एका रांगेत आल्यावर ग्रहण लागते.

जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मधोमध येते, तेव्हा चंद्र ग्रहण आणि चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मधोमध आल्यावर सूर्यग्रहण होते. हा सावल्यांचा खेळ असतो. पूर्वी समाजात ग्रहणाबाबत बरेच समज-गैरसमज होते. पण वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होत गेल्याने गैरसमज नाहीसे होत आहेत, ही चांगली गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com