Margao News : केजरीवाल यांना पंतप्रधान होणार असल्याने अटक : पालेकर

Margao News : भाजपकडून ईडीचा गैरवापर, मडगावात निदर्शने
Margao
MargaoDainik Gomantak

Margao News :

मडगाव, सध्‍या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशातून इंडिया आघाडीला जो प्रतिसाद मिळत आहे, त्‍यामुळे भाजपचे धाबे दणाणले आहेत.

इंडिया आघाडी सत्तेवर आल्‍यास अरविंद केजरीवाल हे देशाचे पंतप्रधान बनू शकतात. ही भीती वाटत असल्‍यामुळेच त्‍यांच्‍या विरोधात खोटा गुन्‍हा दाखल करून त्‍यांना अटक करण्‍यात आली आहे, असा दावा आपचे गोवा प्रदेश अध्‍यक्ष अमित पालेकर यांनी केला.

आज या अटकेच्‍या निषेधार्थ आम आदमी पक्षाच्‍या कार्यकर्त्यांनी मडगावात निदर्शने केली. तसेच ईडीचा प्रतिकात्‍मक पुतळ्‍याचे दहन केले.

यावेळी पालेकर म्‍हणाले, विनाशकाले विपरीत बुद्धी असे म्‍हटले जाते. भाजपसाठीही कालची ही अटक पश्चात्ताप करण्‍यास लावणारी ठरेल. भाजपचा अंत जवळ आला आहे हेच या कृतीतून दिसून येते. अरविंद केजरीवाल यांना अटक केल्‍यामुळे लोकांमध्‍ये संताप निर्माण झाला आहे त्‍याचा फटका देशभरात भाजपला बसेल, असा दावा त्‍यांनी केला.

Margao
Goa Shigmotsav 2024 : पणजी शहरात सोमवारपासून शिमगोत्सवाची धूम

या निषेध आंदोलनात वेळ्‍ळीचे आमदार क्रू्र सिल्‍वा आणि आपचे अन्‍य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्‍थित होते.

बाणावलीचे आमदार वेंझी व्‍हिएगस यांनी सांगितले की, सध्‍या इलेक्‍ट्रॉल बॉण्‍ड हा विषय चर्चेत आल्‍यामुळे भाजप अडचणीत आला आहे. देशातील लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्‍यासाठी ही अटक करण्‍यात आली आहे. देशात सत्तेत असलेल्‍या मुख्‍यमंत्र्यांना अटक केल्‍याचे यापूर्वी कधीही ऐकू आले नव्‍हते.

कित्‍येक मुख्‍यमंत्र्यांवर भ्रष्‍टाचाराचे आरोप झाले. पण त्‍यांना कधी कुणी अटक केली नाही. ज्‍यावेळी भाजप अडचणीत येतो आणि विरोधक वरचढ होतात त्‍यावेळी सीबीआय आणि ईडी यासारख्‍या यंत्रणांचा दुरुपयोग केला जातो हे यापूर्वी दिसून आले आहे. केजरीवाल यांना झालेली अटकही याच प्रकारची असल्‍याचे ते म्‍हणाले.

डॉ. प्रमोद सावंत यांनाही अटक करा - काँग्रेस

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोविडच्या काळात प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार केल्याचा जाहीर आरोप करणारे गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ जारी करून कॉंग्रेस पक्षाने सावंत यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

गोव्‍यात कोविडचा कहर माजलेला असताना मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी खनिज वाहतूक चालू ठेवू देऊन ही साथ गोव्‍यात फोफावली. या निर्णयामागे भ्रष्‍टाचारच कारणीभूत होता असा आरोप त्‍यावेळी मलीक यांनी केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com