Arambol Accident: हरमल येथे अपघातात दोघा भावांचा दुर्दैवी अंत; वाहनचालकांना ताब्यात देण्याची संतप्त स्थानिकांची मागणी...

आरोंदेकरवाडा-हरमल येथील उदयोन्मुख तबलापटू साहील शंकर नाईक (वय १७ वर्षे) आणि त्याचा चुलतभाऊ दीप दिलीप नाईक (वय २१ वर्षे) या दोघांचा अपघातात मृत्यू झाला.
Arambol Accidental Death Case
Arambol Accidental Death CaseDainik Gomantak

Arambol Accidental Death Case

आरोंदेकरवाडा-हरमल येथील उदयोन्मुख तबलापटू साहील शंकर नाईक (वय १७ वर्षे) आणि त्याचा चुलतभाऊ दीप दिलीप नाईक (वय २१ वर्षे) या दोघांचा अपघातात मृत्यू झाला. दोघा भावांच्या मृत्युमुळे मित्रपरिवार आणि स्थानिक ग्रामस्थ संतप्त झाले असून, त्यांनी या अपघातास कारणीभूत ठरलेल्या दोन्ही वाहनांच्या चालकांना ताब्यात देण्याची मागणी केली आहे.

शनिवारी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास हे दोन्ही बंधू दुचाकीवरून तिठ्याकडून घरी जात असता मेथर वाड्यावरील हॉटेलनजीक थांबलेल्या स्विफ्ट कारचा दरवाजा अचानक उघडल्याने साहीलने दुचाकी दुसरीकडे वळविली.

त्याचवेळी समोरून येणाऱ्या अन्य एका वाहनाच्या चाकाखाली ते दोघे सापडले. त्यात ते गंभीर जखमी झाले. साहील याचा काही वेळाने मृत्यू झाला, तर दीप नाईक हा गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू होते. मात्र, रात्री उशिरा उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.

ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे कार ताब्यात : अपघातानंतर वास्को येथील स्विफ्ट कारचालकाने (जीए-०७-एफ-८१३९) घटनास्थळावरून पलायन केले. ग्रामस्थांनी त्या कारचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना काहीच माहिती मिळाली नाही. त्याचवेळी मांद्रे येथे ही कार एका युवकाने पाहिली आणि त्याने ग्रामस्थांना कळविले. ग्रामस्थांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी ही कार ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

बेतकीत युवक-युवती जखमी

बेतकी येथे शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास प्रवासी बस आणि दोन दुचाकींची टक्कर होऊन एका दुचाकीवरील युवक आणि युवती जखमी झाली. जखमींची नावे अब्बास शेख (जुने गोवे) आणि दिव्या पांढरेकर (मडगाव) अशी आहेत.

त्यांना उपचारासाठी गोमेकॉत दाखल केले आहे. अन्य एक दुचाकीस्वार आजम खान (रा. खोर्ली) हा किरकोळ जखमी झाला. त्याच्यावर बेतकी आरोग्य केंद्रात उपचार केले. त्याचवेळी आणखी एक दुचाकी घसरून पडली; पण दुचाकीस्वाराला किरकोळ जखम झाली. म्हार्दोळ पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com