Arambol Accident Update: हरमल अपघातातील 'त्या' स्विफ्ट चालकाला अटक! सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

हरमल येथे झालेल्या अपघातात साहील शंकर नाईक (17) आणि दीप दिलीप नाईक (21) या दोन चुलत भावांचा दुर्दैवी अंत झाला.
Arambol Accident Driver Arrested
Arambol Accident Driver ArrestedDainik Gomantak

Arambol Accident Driver Arrested

हरमल येथे झालेल्या अपघातात साहील शंकर नाईक (17) आणि दीप दिलीप नाईक (21) या दोन चुलत भावांचा दुर्दैवी अंत झाला. याप्रकरणी संशयित स्विफ्ट कारचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. कारचालकाला आपल्या ताब्यात देण्याची मागणी संतप्त स्थानिकांनी केली होती.

अपघातानंतर वास्को येथील स्विफ्ट कारचालकाने (जीए-07-एफ-8139) घटनास्थळावरून पलायन केले. ग्रामस्थांनी त्या कारचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना काहीच माहिती मिळाली नाही. त्याचवेळी मांद्रे येथे ही कार एका युवकाने पाहिली आणि त्याने ग्रामस्थांना कळविले. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून कारचालक नरेश गंठुला (24) आणि बंदी राजशेखर (24) या तेलंगणामधील दोन पर्यटकांना पोलिसांनी अटक केली आहे.

असा घडला अपघात....

शनिवारी (ता. 17) संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास हे दोन्ही बंधू दुचाकीवरून तिठ्याकडून घरी जात असता मेथर वाड्यावरील हॉटेलनजीक थांबलेल्या स्विफ्ट कारचा दरवाजा अचानक उघडल्याने साहीलने दुचाकी दुसरीकडे वळविली.

त्याचवेळी समोरून येणाऱ्या अन्य एका वाहनाच्या चाकाखाली ते दोघे सापडले. त्यात ते गंभीर जखमी झाले. साहील याचा काही वेळाने मृत्यू झाला, तर दीप नाईक हा गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू होते. मात्र, रात्री उशिरा उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com