कोणीही आलतू-फालतू ज्याला काहीच किंमत नाही तेही सरकारवर टीका करतायेत - मुख्यमंत्री सावंत

कुडचडे- काकोडा येथील अद्यावत सामुदायिक आरोग्य केंद्राचे मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते उद्घाटन
Pramod Sawant
Pramod Sawant

Pramod Sawant: आपल्याकडे काय आहे याची आपल्याला किंमत नाही आणि मग कोणीही आलतू-फालतू ज्याला काहीच किंमत नाही तो उठून सरकारवर टीका करतो. राजकीय टीका केली जाते, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

कुडचडे- काकोडा येथील अद्यावत केलेल्या सामुदायिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते मंगळवारी (दि.02) करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

'आपल्याकडे काय आहे याची आपल्याला किंमत नाही, आलतू-फालतू ज्याला काहीच किंमत नाही तो उठून सरकारवर टीका करतो. फक्त टीका नव्हे तर राजकीय टीका केली जाते. तेच मग वृत्तपत्रात छापून येते, त्याचे व्हिडिओ व्हायरल होतात.'

'ज्याला काहीच किंमत नाही तो जास्त बोलतो. हे नाही, ते नाही असे म्हणत, मागील काही दिवसापूर्वी काहीजणांनी आंदोलन केले. काँग्रेस सरकारच्या पूर्ण पाच वर्षांच्या कार्यकाळात काय केले हे त्यांनी मला सांगावे.'

'गोव्यात ज्याप्रकारचा विकास झाला आहे. मी 2012 पासून आमदार आहे. मागील 12 वर्षापासून तुम्ही मला पाहत आहात. आता पेडणेपासून काणकोणपर्यंत पायाभूत सुविधा, आरोग्य यासरख्या अनेक बाबींचा विकास झाला आहे,' असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

दक्षिण गोव्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा विचार आम्ही करत आहोत. यामुळे GMC वरील भार कमी होण्यास मदत होईल, तसेच, जिल्ह्यातील लोकांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com