Crime News : संशयित अंकित त्रिपाठीला १० दिवसांची न्यायालयीन कोठडी; जामीन अर्ज मागे

Crime News : : प्रमाणापेक्षा अधिक मद्यप्रशान,त्याने जामिनासाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे. त्याच्या न्यायालयीन कोठडीत आणखी १० दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
Arrested
ArrestedDainik Gomantak

Crime News :

पणजी, जुन्या मांडवी पुलावरील अपघातात दुचाकीस्वाराच्या मृत्यूला कारणीभूत असलेला संशयित अंकित त्रिपाठी हा मद्यप्राशन करून कार चालवत होता.

तसेच हे मद्याचे प्रमाण अधिक असल्याचे उघड झाले आहे. त्याने जामिनासाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे. त्याच्या न्यायालयीन कोठडीत आणखी १० दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तसेच त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पणजी पोलिसांनी दुचाकीस्वाराचा मृतदेह सापडेपर्यंत संशयित अंकित त्रिपाठी याला ताब्यात ठेवले होते. त्यामुळे त्याने जामिनासाठी अर्ज केला होता.

Arrested
Goa Police : पोलिस प्रशिक्षणार्थींना बढतीची संधी! मुख्यमंत्री

न्यायालयाने नोटीस बजावून त्यावरील सुनावणी सोमवारी (ता.२६) ठेवली होती. पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यू व त्यानंतर भादंसंच्या कलम ३०४ (सदोष मनुष्यवध) व २७९ (निष्काळजीपणा) याखाली गुन्हा दाखल केल्याने त्याचा जामिनासाठीचा अर्ज मागे घेण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com