Goa News: गोमंतकीय असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान!

Goa News: अमोघ गुडेकर, आसिफ मुल्ला: उत्तराखंड दुर्घटनेतील 41 मजुरांना बाहेर काढण्यात मौलिक मदत
How was the Uttarakhand Tunnel Rescue Operation carried out? Read, 'A to Z' stories of 41 life-saving operation.
How was the Uttarakhand Tunnel Rescue Operation carried out? Read, 'A to Z' stories of 41 life-saving operation.Dainik Gomantak

Goa News: आम्ही गोमंतकीय असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, आणि अशा दुर्घटनांना सामोरे जाऊन आपद्गग्रस्तांना दिलासा देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, तत्पर आहोत, हेच या घटनेतून दाखवून दिले आहे.

How was the Uttarakhand Tunnel Rescue Operation carried out? Read, 'A to Z' stories of 41 life-saving operation.
Goa Congress: दक्षिणेत अल्पसंख्याक उमेदवारच हवा

असे उद्‍गार सिल्कयारा दुर्घटनेत अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी तैनात पथकातील अमोघ अरुण गुडेकर व आसिफ मुल्ला या दोन्ही गोमंतकीय अभियंत्यांनी काढले आहेत.

फोंड्यातील अमोघ गुडेकर तर प्रतापनगर-धारबांदोड्यातील आसिफ मुल्ला या गोमंतकीय अभियंत्यांनी प्रचंड थंडीतही कसब पणाला लावले. ड्रोन तंत्र वापरून बोगद्यात अडकलेल्यांना कोणताही धोका उद्भवू नये यासाठी आडव्या पद्धतीने माती व दगड खोदण्याचे काम करताना ‘ड्रोन’चे परीक्षण उपयोगी ठरले.

मंत्री विश्‍वजित राणेंकडून कौतुक

आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी ट्वीट करून अमोघ आणि आसिफ यांचे कौतुक करून सार्थ अभिमान व्यक्त केला आहे. अमोघ आणि आसिफ यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छाही राणे यांनी दिल्या आहेत.

‘जीव्हीएम’कडून अभिनंदन...!

फोंड्यातील गोवा विद्याप्रसारक मंडळ जीव्हीएम संस्थेने गोमंतकीय अभियंत्यांचे अभिनंदन केले आहे. अमोघ गुडेकर हा फोंड्यात आल्मेदा हायस्कूलमध्ये तर आसिफ खांडेपार येथील एमआयबीके विद्यालयात शिकत होता. शिक्षणानंतर ते बेंगळुरूस्थित कंपनीत रूजू झाले. त्यांच्या कार्याची दखल जीव्हीएमने घेऊन अभिनंदन केले.

How was the Uttarakhand Tunnel Rescue Operation carried out? Read, 'A to Z' stories of 41 life-saving operation.
Mahadayi River: म्हादईप्रश्‍नी सुनावणी अधांतरी

उत्तराखंडमधील बोगद्यातील कामगारांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरल्याने मनाला खूप बरे वाटले. या बचावकार्यात गोव्यातील दोन अभियंत्यांचा समावेश केल्याची माहिती माझ्या मुलानेच दिली होती. यात अमोघ हा माझा मुलगा आणि आसिफ हा त्याचा मित्र होता. थोडी धास्ती होती, पण खात्री होती. गोमंतकीय कशातहीत कमी नाहीत, हेच या घटनेने दाखवून दिले आहे.

- अरुण गुडेकर , फोंडा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com