आलेक्स सिक्वेरा यांची राजकीय पुनरागमनाची तयारी

आलेक्स सिक्वेरा
आलेक्स सिक्वेरा

मडगाव
गेल्या १५ दिवसांत काँग्रेस पक्षाच्या दोन महत्वाच्या पत्रकार परिषदांमध्ये ते झळकले होते. मडगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्या सोबत ते उपस्थित होते, तर तीन दिवसांपूर्वी पणजीत काँग्रेस मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषद त्यांनीच प्रामुख्याने संबोधित केले होते.
नुवे मतदारसंघात काँग्रेसतर्फे निवडून आलेले विल्फ्रेड (बाबाशान) डिसा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला नुवेत ताकदवान उमेदवाराची गरज आहे. त्यामुळे सिक्वेरा यांना पुन्हा काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
नुवे हा फेररचनेपूर्वी लोटली मतदारसंघ होता. या मतदारसंघातून सिक्वेरा १९९४ ते २००७ पर्यंत सलग चारवेळा निवडून आले होते. अठरा वर्षे त्यांचे या मतदारसंघावर वर्चस्व होते. त्यांनी वीज व वनमंत्रीपदही सांभाळले होते.
फेररचनेनंतर २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत मिकी पाशेको यांनी त्यांना शह दिला. त्यानंतर ते मुख्य राजकीय प्रवाहाच्या बाहेर फेकले गेले. २०१७ मध्ये काँग्रेसने सिक्वेरा यांना डावलून नुवेची उमेदवारी विल्फ्रेड डिसा यांना दिली. तेव्हा जिल्हा पंचायत सदस्य असलेल्या डिसा यांनी नुवे मतदारसंघावर आपली पकड बसवली होती. आता डिसा यांनीच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने नुवेत काँग्रेस नेत्याची पोकळी निर्माण झाली आहे. या बदललेल्या राजकीय समीकरणामुळे सिक्वेरा यांच्यासाठी राजकीय पुनरागमनाची संधी निर्माण झाली आहे.

संपादन - यशवंत पाटील

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com