Parra News : नावेलीत इको फ्रेंडली आकाश कंदील बनविण्याची कार्यशाळा

सर्जनशीलता प्रदर्शित करण्याच्या दृष्टीने एक मंच प्रदान करण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित केली असल्याचे सांगितले.
Navelim Sachin Jadhav, Utkarsha Naik, in Akashkandil workshop.
Krishna Gavas and others.
Navelim Sachin Jadhav, Utkarsha Naik, in Akashkandil workshop. Krishna Gavas and others.Dainik Gomantak

Parra News : पर्ये, सरकारी माध्यमिक विद्यालय नावेली-साखळी यांनी विद्यार्थी शिक्षक आणि पालकांसाठी आयोजित केली होती. येथील विद्यालयात नुकतीच ही कार्यशाळा पार पाडली.

या कार्यशाळेत हस्तकलाकार सचिन जाधव यांनी बांबूच्या काड्यांपासून आकाशकंदील बनविण्याची प्रात्यक्षिके दाखवली. विद्यार्थी आणि शिक्षक वर्गाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारचे आकाशकंदील बनवले.

यावेळी झालेल्या उद्‌घाटन कार्यक्रमात विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उत्कर्षा नाईक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि स्थानिक सरपंच कालिदास गावस, प्रमुख शिक्षक कृष्णा गावस, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत गावस, सभासद सिया गावडे, संजना गावस, पिया

गावस, सुंदर गावस, किशोर गावस, नारायण गावस आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृष्णा गावस यांनी केले. कार्यशाळेच्या शेवटी मान्यवरांना स्मृतिचिन्ह देण्यात आले. देविता नाईक यांनी आभार मानले.

पारंपरिकतेला प्राधान्य

यावेळी कृष्णा गावस यांनी बांबूचा वापर करून इकोफ्रेंडली आकाशकंदील वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी, कलात्मक उत्कृष्टतेला चालना देण्यासाठी, संस्कृती आणि परंपरांबद्दल प्रेम

वाढवण्यासाठी आणि सर्वांना त्यांची प्रतिभा आणि सर्जनशीलता प्रदर्शित करण्याच्या दृष्टीने एक मंच प्रदान करण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित केली असल्याचे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com