Goa AAP

Goa AAP

Dainik gomantak

आप सामान्य जनतेचा पक्ष, गोव्यात इतिहास घडवणार, कारण...

'आम्ही गोव्याच्या जनतेला पाणी, वीज मोफत देण्यासाठी पुढाकार घेतला आहे'

आम आदमी पक्ष सामान्य जनतेचा पक्ष असल्याने, अनेक राज्यात पक्षाने यश संपादन केले आहे. युवा आजचा महत्त्वाचा समर्थक बनवून गोव्यात इतिहास घडवणार. कारण, आप आंदोलनातून घडलेला पक्ष असल्याने राज्यात विजय नक्कीच होणार असल्याचे प्रतिपादन दिल्ली वजीरपुर आपचे आमदार राजेश गुप्ता यांनी केले.

दाबोळी वाडे येथील आम आदमी पक्षाचे (AAP) उपाध्यक्ष प्रेमानंद बाबू नानोस्कर यांच्या कार्यकर्त्यांच्या सभेत दिल्ली वजीरपुरचे आमदार राजेश गुप्ता बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पांडुरंग कोल्हापुरे, शेख नुहा, नारायण नाईक, देवप्पा गावकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना दिल्लीचे आमदार (MLA) गुप्ता म्हणाले की गोव्यात (goa) आम आदमी यशस्वी होण्यासाठी येथील जनतेचा पक्ष बनून आलेला आहे.

<div class="paragraphs"><p>Goa AAP</p></div>
विकासकामे बंद केल्याने गोवा फॉरवर्डच्या कार्यकर्त्यांनी केला चक्का जाम !

देशात हवा आणि निसर्गाची देण असल्याने आम्ही गोव्याच्या जनतेला पाणी, वीज मोफत देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दाबोळी प्रेमानंद नानोस्कर अवश्य यशस्वी होणार यात अजिबात शंका नसल्याची माहिती आमदार गुप्ता यांनी कार्यकर्त्यांना दिली. आपल्या जीवनात दुसऱ्याचे चांगले केल्याने आपल्याला समाधान प्राप्त होते. याचे उद्दिष्टाने कार्यकर्त्यांनी आपले कार्य समाजात करावे असे दिल्लीचे आमदार राजेश गुप्ता कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.

<div class="paragraphs"><p>Goa AAP</p></div>
TMC चे सरकार सत्तेवर आल्यास सत्तरीतील 'जमीन' मालकीचा प्रश्न सोडवणार

यावेळी आपचे उपाध्यक्ष प्रेमानंद नानोस्कर म्हणाले की आपचे काम म्हणजे पूर्ण समाज सेवा म्हणूनच पक्ष शिक्षण, उद्योग, आरोग्य क्षेत्रात गोव्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. राज्यातील सरकार (Government) भ्रष्टाचाराने ग्रासलेली असल्याने येथील जनतेला एकमेव पर्याय म्हणजे आम आदमी पक्ष. दाबोळी (Dabolim) मतदार संघ (Constituency) येथील लोकप्रतिनिधीने विकासापासून दहा वर्षे मागे टाकलेला आहे. दाबोळीचा विकास करण्याची क्षमता फक्त माझ्यात असल्याची प्रतिक्रिया नानोस्कर यांनी दिली. दाभोळीत आपचा विजय निश्चित असल्याने सत्ताधारी पक्ष घाबरला असल्याची माहिती शेवटी नानोस्कर यांनी दिली. कार्यकर्त्याच्या सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीमती रोशनी डिसिल्वा यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com