Goa Accident: बोडगिणी येथील अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वार बँक कर्मचाऱ्याचा उपचारावेळी मृत्यू

ज्या टेम्पोरिक्षाने धडक दिली, त्याच्या चालकाकडे नव्हता वाहतूक परवाना
Goa Accident
Goa AccidentDainik Gomantak

Goa Accident: म्हापशातील बोडगिणी येथे बोशान इमारतीसमोर एका मालवाहू रिक्षाने दुचाकीला ठोकर दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेले जगदीश मंगेश शेटकर (62. रा खडपावाडा, म्हापसा) या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शेटकर हे लोकमान्य बँकेच्या म्हापसा शाखेचे कर्मचारी होते.

Goa Accident
Goa Accident: पठ्ठ्यानं हेलमेट सोबत घेतलं, पण डोक्यावर नाही घातलं; अन्...

हा अपघात बुधवारी दुपारी 2.30 च्या सुमारास झाला. शेटकर हे आपल्या जीए 03 एएस 7948 या स्कुटरवरून बोशान इमारतीमधील लोकमान्य बँकेच्या शाखेत जात होते. इमारतीकडे जाण्यासाठी स्कुटर वळवताच काणकाहून म्हापशाच्या बाजूने येणार्‍या जीए 03 एएच 1010 क्रमांकच्या मालवाहू टेम्पोरिक्षाने त्यांच्या स्कुटरला जोरदार धडक दिली.

या अपघातात शेटकर हे गंभीर जखमी झाले. त्यांना लगेच उपचारासाठी जिल्हा इस्पितळात व त्यानंतर गोमेकॉत दाखल केले गेले. तिथे उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

अपघाताचा पंचनामा म्हापसा पोलीस उपनिरीक्षक विराज कोरगावकर व हवालदार केशव नाईक यांनी केला.

निष्काळजीपणे वाहन हाकून सदोष्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला व संशयित टेम्पोरिक्षा चालक धोंडीबा गणपत कोचकर (45, रा. चंदगड) याला अटक करण्यात आली आहे. संशयित वाहन चालक परवान्याविना गाडी चालवत होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com