Leopard In Borim: बोरीत अनेकांचा बिबट्यासोबत ‘मॉर्निंग वॉक’

Leopard In Borim: सोशल मीडियावर मिम्‍स : अखेर वन विभागाकडून जेरबंद, बोंडलात रवानगी
Leopard in Borim
Leopard in BorimDainik Gomantak

Leopard In Borim: एरवी बिबट्या, वाघ रात्री-अपरात्री लोकवस्तीत येऊन गेल्याच्या केवळ बातम्यांमुळेच लोकांमध्ये घबराट पसरते. परंतु आज (शुक्रवारी) सकाळी बिबट्या चक्क लोकवस्तीतून बिनधास्तपणे फिरताना दिसला. विशेष म्हणजे, त्याच्या आजूबाजूने काहीजण फिरत होते, तरीही त्याने कोणावर आक्रमण केले नाही.

Leopard in Borim
Ayodhya Temple: मुख्यमंत्री देवदर्शन योजनेत आता अयोध्येचा समावेश

अधिक माहिती अशी की, बोरी सर्कलजवळील गडगावाडा या भर लोकवस्तीत शुक्रवारी सकाळी 7.20 वाजण्याच्या सुमारास एका बिबट्याने प्रवेश करून लोकांची भंबेरी उडविली. मोकळ्या रस्त्यावरून हा बिबट्या बिनधोकपणे फिरत होता. तर स्थानिक लोक आपल्या घरात,

अंगणात, रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून हा अजब प्रकार पाहात होते. बिबट्याला भरवस्तीत पाहून अनेकांचे धाबे दणाणले, तर बऱ्याच लोकांनी मोबाईलवर या प्रकाराचा व्हिडिओ तयार करून इतरांना पाठवला.

हा बिबट्या थेट गडगावाड्यावरून झुआरी नदीकडे गेला. या बिबट्याने गावातून जाताना कोणाकडेच पाहिले नाही की, कोणाला इजाही केली नाही. मात्र, या बिबट्यापासून होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी वन खात्याने त्याला सापळ्यात पकडले आणि बोंडला अभयारण्यात त्याची रवानगी केली. गेल्या काही दिवसांपासून शिरशिरे, कुडयाळ या परिसरात हा बिबट्या भरवस्तीत फिरत असल्याचे लोकांनी पाहिले होते.

Leopard in Borim
Goan Special Recipe: आता घरच्या घरी बनवा; गोवन स्पेशल रेसिपी: कॅफेरियल चिकन

अन् अचानक रस्त्यावर ‘एन्ट्री’

काही दिवसांपूर्वी बेतोड्याचे सरपंच मधू खांडेपारकर यांच्या घरासमोर बिबट्याने अचानक रस्त्यावर उडी मारल्याने लोकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. खांडेपारकर यांनी वन अधिकारी दीपक तांडेल यांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानुसार तांडेल यांनी परिसरात गस्त घालण्याचे आश्‍वासन दिले होते.

त्याचा ‘दरारा’ कुठे गेला?

बिबट्या हा आक्रमक प्राणी आहे. एरवी लोकवस्तीत त्याचा वावर सुरू झाला की, अनेकांची बोबडी वळते. मात्र, आज बोरीत आढळलेला बिबट्या अतिशय मलूल दिसत होता. तो इतरत्र कुठेही न पाहता नजरेसमोर चालत होता. कदाचित बरेच दिवस तो भुकेला किंवा तो आजारी असावा, अशी चर्चा सुरू होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com