Goa Crime News : चरस बाळगल्याप्रकरणी दिल्लीतील एकाला अटक; कळंगुट पोलिसांची कारवाई

ओर्डा-कांदोळी येथे 65 किमतीचे चरस बाळगल्याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी संशयित पिंकू पाल याला ताब्यात घेतले आहे.
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak

Goa Drug Case : परप्रांतीय आणि काही विदेशी पर्यटकांकडून गोव्यात राजरोसपणे अमली पदार्थांची तस्करी होत आहे. याला आळा घालण्यासाठी गोवा पोलीस सापळा रचून या प्रकरणांवर कारवाई करत आहेत. यामध्ये अबकारी खातेही सक्रियपणे कार्यरत आहे.

Goa Crime News
Goa News: ‘वकील’ बनून आला, अन्‌ चोरी करून गेला!

दिवसागणिक वाढणाऱ्या या प्रकारांमुळे सरकारची आणि पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. कळंगुट पोलिसांनी अशीच एक कारवाई करत अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एकाला आपल्या ताब्यात घेतले आहे.

ओर्डा-कांदोळी येथे 65 किमतीचे चरस बाळगल्याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी संशयित पिंकू पाल याला ताब्यात घेतले आहे. त्याचे वय 24 असून तो मूळचा दिल्लीचा रहिवासी आहे. त्याच्याकडून 129 ग्रॅम चरस जप्त करण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, कालही अशीच एक घटना घडली होती. हणजुणे पोलिसांनी ड्रग्जच्या छाप्यात चरससह शिवोली येथील एकाला अटक केल्याची घटना घडली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी जीवबा दळवी, पीआय प्रशाल एन. देसाई यांच्या नेतृत्वाखाली अंजुना पोलिसांच्या पथकाने 31 जानेवारी रोजी सदरची कारवाई केलीय.

शिवोली येथील फुटसल मैदानाजवळ सायंकाळी पोलिसांनी हि छापेमारी केली. त्यादरम्यान आरोपी विनोद साळगावकर (वय 54 रा.शिवोली) याच्या ताब्यात 680 ग्रॅम वजनाचे चरस हे सापडले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com