IMA Goa: गोव्यातील 42 टक्के डॉक्टर नैराश्य आणि चिंताग्रस्त, ताणतणाव कमी करण्यासाठी घेतायेत मद्याचा सहारा

सर्वसामान्यांच्या तुलनेत डॉक्टरांमध्ये आत्महत्या करण्याची प्रवृत्ती अधिक वाढलीय असेही अहवालात म्हटलंय.
IMA Goa Report
IMA Goa ReportDainik Gomantak

IMA Goa Report: इंडियन मेडिकल असोसिएशन, गोवाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात राज्यातील डॉक्टरांबाबत धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. मद्यपान करणाऱ्या डॉक्टरांपैकी प्रत्येक पाचवा डॉक्टर ताणतणाव कमी करण्यासाठी दारू पीत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

तसेच, सर्वसामान्यांच्या तुलनेत डॉक्टरांमध्ये आत्महत्या करण्याची प्रवृत्ती अधिक वाढलीय असेही अहवालात म्हटलंय.

काय म्हटलंय अहवालात

गोव्यातील 42 टक्के डॉक्टर नैराश्य आणि चिंताग्रस्त आहेत. गोव्यातील 12-15 टक्के डॉक्टर मद्यपान करत असल्याचे अहवालात म्हटले आहे. तर, 20 टक्के डॉक्टर तणावाचा सामना करण्यासाठी मद्यपान करत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यास हानी पोहोचत असल्याचे अहवाल सांगतो.

एवढेच नव्हे तर, डॉक्टर एवढा दबाव आणि मानसिक समस्यांमधून जात आहेत की, सर्वसामान्यांच्या तुलनेत डॉक्टरांमध्ये आत्महत्या करण्याची प्रवृत्ती अधिक वाढली आहे.

गोव्यातील डॉक्टरांच्या आरोग्य तपासणीच्या उद्देशाने पहिल्यांदाच हे सर्वेक्षण करण्यात आले.

IMA मध्ये नोंदणीकृत 315 डॉक्टरांचा या सर्वेक्षणात समावेश होता, असे अहवालात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com