डिचोली : मये गावच्या 35 रहिवाश्यांना जमीनीचे ‘वर्ग II’ प्रमाणपत्र मिळाले

jamin.jpg
jamin.jpg

पणजी : गोवा (goa) मुक्तीनंतर 60 वर्षे होऊनही  जागेचा मालकी  हक्क  न मिळालेल्या डिचोली (Bicholim) तालुक्यातील मये गावच्या  35 रहिवाश्यांना आज 17 जून रोजी रहिवाश्यांच्या ताब्यात असलेल्या जमीनीबाबत ‘ वर्ग II’ चे हक्काचे प्रमाणपत्र (Certificate) देण्यात आले.(35 residents of Maye village got ‘Class II’ certificate of land)

मये गावातील सुमारे 35 जणांना सदर प्रमाणपत्रे गोव्याच्या महसूल मंत्री जेनिफर मॉन्सेरात (Jennifer Monserrate) आणि मयेचे आमदार प्रवीण झांट्ये यांच्या हस्ते देण्यात आली. येथील  काही भागातील मालमत्तेबाबत गोवा सरकार व पोर्तुगीज वारसदार यांच्यात वाद आहे आणि त्यामुळे अनेकांना आपल्या घराचा विस्तार,दुरुस्ती करताना अनेक अडचणी येतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com