उपद्रव निर्माण करणाऱ्या 2 पर्यटकांना काणकोण येथे अटक

गावडोंगोरि येथील धबधब्यांवर वारंवार येणारे पर्यटक दारू पिऊन उपद्रव करतात
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak

काणकोण: गावडोंगोरि येथील धबधब्यांवर वारंवार येणारे पर्यटक दारू पिऊन उपद्रव करतात या उपविभागीय दंडाधिकारी (SDM) आणि काणकोणचे उपजिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निवेदनावर कारवाई करत, काणकोण पोलिसांनी भूपोर आणि बामणबुद्दो येथील गुंजी तळीच्या ठिकाणी भेट दिली आणि दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या दोजणांना ताब्यात घेतले.

(2 tourists held for creating nuisance in goa)

Goa Police
राजधानीसह शहरांतील रस्ते ‘खड्डेमय’!

या दोघांना एसडीएमसमोर हजर करण्यात आले, त्यांनी त्यांना वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडले. पुढील तपास पीएसआय रामचंद्र नाईक करीत आहेत. गांवडोंगोरी पंचायतीचे प्रशासक, प्रदीप पागी यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली होती की अनेक रहिवाशांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता की, दरम्यान संबंधीत नागरिक मोठ्याने संगीत वाजवतात, मद्यपान करतात आणि कधीकधी रस्त्यावर नग्न नृत्य करतात अश्या प्रकारच्या तक्रारी समोर येत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com