सरत्या वर्षाचा निरोप ठरला अखेरचा, गोव्यात बेपत्ता झालेल्या मल्याळी तरुणाचा मृत्यू

नवीन वर्षाच्या सेलिब्रेशननंतर गोव्यात बेपत्ता झालेल्या मल्याळी तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
Kerala Youth Found Dead In Goa
Kerala Youth Found Dead In GoaDainik Gomantak

Kerala Youth Found Dead In Goa: सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर देश-विदेशातील पर्यटक गोव्यात हजेरी लावत असतात. यावर्षी नवीन वर्षाच्या सेलिब्रेशननंतर गोव्यात बेपत्ता झालेल्या मल्याळी तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

मूळचा वैकोम कुलशेखरमंगलम येथील रहिवासी असलेल्या संजय (19) याचा मृतदेह गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर आढळून आला.

नववर्ष साजरे करण्यासाठी संजय 29 डिसेंबर रोजी वैकत येथून दोन मित्रांसह गोव्याला गेला होता. 30 डिसेंबरला मित्रांसोबत तो गोव्यात आला. नववर्षाच्या पूर्वसंध्येला झालेल्या सेलिब्रेशननंतर संजय बेपत्ता झाला होता.

संजय बेपत्ता झाल्याची नातेवाईकांनी थलयोलापरम पोलिसांत तक्रार दाखल केली. ही तक्रार नंतर गोवा पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. दरम्यान, समुद्रकिनारी एक मृतदेह असल्याची माहिती गोवा पोलिसांकडून मिळाली. त्यानंतर मित्र आणि नातेवाईक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी संजयच्या मृतदेहाची ओळख पटवली.

मृतदेह शवविच्छेदनासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत मृतदेह संजयच्या मूळगावी वैकोम कुलशेखरमंगलम येथील घरी आणण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com