Cancona News: काणकोणातील वीज समस्या निवारणासाठी 150 कोटी मंजूर

वीजमंत्री : श्रमधाम योजनेतील घरबांधणी उपक्रमांना भेट
Cancona News
Cancona NewsDainik Gomantak

काणकोणातील किनारी व अंतर्गत भागातील खंडित वीजसमस्या निकालात काढण्यासाठी 150 कोटी रुपये मंजूर झाले आहेत, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी गुरुवारी (ता.२३) काणकोणात दिली.

यावेळी त्यांच्यासोबत सभापती रमेश तवडकर व सरपंच, नगरसेवक उपस्थित होते. या निधीतून किनारी भागात भूमिगत वीजवाहिन्या, जीर्ण ट्रान्सफॉर्मर, वीजवाहिन्या बदलणे ही कामे करण्यात येणार असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले.

या पाहणीनंतर त्यांनी देवाबाग येथील सभापतींसमवेत कार्यकर्ते, सरपंच, पंच, नगरसेवक व वीज खात्याचे अभियंते यांची संयुक्त बैठक घेतली. यावेळी विशाल देसाई, सरपंच आनंदु देसाई, सविता तवडकर, फातिमा रॉड्रिग्स, महेश नाईक, संजू तिळवे, दिवाकर पागी उपस्थित होते.

Cancona News
Goa Weather: सावधान! हवामानाचा मूड बदलतोय

एका घराचा सर्व खर्च

गुरुवारी मंत्री ढवळीकर यांनी आपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांसह सभापतींनी श्रमधाम योजनेतून सुरू केलेल्या घरबांधणी उपक्रमांना भेट दिली. त्यांनी अर्धफोंड, कुंभेगाळ येथे उभारण्यात येणाऱ्या घरांची पाहणी केली.

त्यानंतर काराशिरामळ-आगोंद येथे उभारण्यात येणाऱ्या घराची पायाभरणी केली. यापैकी एका घराचा सर्व खर्च माधवराव ढवळीकर ट्रस्टतर्फे करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com