England अन् वेल्समधील इतर धर्मांच्या तुलनेत 'हिंदू' सर्वात निरोगी आणि तंदुरुस्त, जनगणनेतून स्पष्ट

England And Wales Census: इंग्लंड आणि वेल्समधील सर्व धार्मिक समूहांमध्ये 'हिंदू' सर्वात निरोगी आणि तंदुरुस्त आहेत.
PM Rishi Sunak
PM Rishi SunakDainik Gomantak

England And Wales Census: इंग्लंड आणि वेल्समधील सर्व धार्मिक समूहांमध्ये 'हिंदू' सर्वात निरोगी आणि तंदुरुस्त आहेत. त्यांच्यामध्ये अपंगत्वाचे प्रमाणही सर्वात कमी आहे. हे नव्या जनगणनेच्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे.

87 टक्के हिंदू निरोगी आहेत

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2021 मध्ये एकूण लोकसंख्येच्या 82 टक्के लोकांच्या तुलनेत 87.8 टक्के हिंदूचे स्वास्थ्य चांगले आहे. हिंदूंमध्ये (Hindu) अपंगत्वाचे प्रमाण सर्वात कमी आहे (8.8 टक्के), त्यानंतर शिख (10.8 टक्के) आणि मुस्लिम (11.3 टक्के) आहेत, जे इंग्लंड आणि वेल्सच्या एकूण 17.5 टक्क्यांच्या खाली आहेत.

PM Rishi Sunak
'India चे पंतप्रधान ओबीसी समाजातून येतात...', सफाई कामगाराच्या मुलीने परदेशात उंचावले देशाचे नाव

स्व-घोषणेवर आधारित आकडेवारीनुसार, एकूण लोकसंख्येच्या 33.8 टक्क्यांच्या तुलनेत हिंदूंमध्ये 'लेव्हल 4 किंवा त्यावरील' पात्रतेची सर्वाधिक टक्केवारी 54.8 टक्के आहे. केवळ 31.6 टक्के ख्रिश्चनांनी नोंदवले की, त्यांच्याकडे समान शिक्षणाचा स्तर आहे.

जनगणनेच्या आकडेवारीवरुन असे दिसून आले आहे की, ज्यूनंतर 'Professional Business' मध्ये हिंदूंची टक्केवारी सर्वाधिक आहे. ते 14.2 टक्के सह 'व्यवस्थापक, संचालक किंवा वरिष्ठ अधिकारी' व्यवसायत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची सर्वाधिक टक्केवारी 34.2 आहे.

PM Rishi Sunak
Census: 'या' हिंदू देशाच्या लोकसंख्येबाबत धक्कादायक आकडेवारी आली समोर, पुरुषांपेक्षा...

त्याचबरोबर, तीन चतुर्थांश किंवा 77.7 टक्के शीख लोकांकडे स्वतःचे घर आहे, जे कोणत्याही धार्मिक समूहापेक्षा जास्त आहे. 2021 मध्ये, 3.9 दशलक्ष 'मुस्लिम' (त्यांच्या एकूण लोकसंख्येच्या 8.4 टक्क्यांच्या तुलनेत 32.7 टक्के) गर्दीच्या ठिकाणी राहत होते. केवळ 45.6 टक्के मुस्लिमांकडे स्वतःचे घर होते.

21 मार्च 2021 रोजी जनगणना झाली

21 मार्च 2021 रोजी इंग्लंड (England) आणि वेल्समध्ये जनगणना झाली. यामध्ये गृहनिर्माण, शिक्षण आणि कल्याण यावरील अनेक प्रश्नांचा समावेश होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com