TikTok:कंपनीच्या सीईओने दिला राजीनामा 45300 कोटी रुपयांचे झाले नुकसान

Tiktok CEO resigns The loss was Rs 45300 crore
Tiktok CEO resigns The loss was Rs 45300 crore

बीजिंग: लोकप्रिय शॉर्ट व्हिडिओ ॲप टिकटॉकची(TikTok) पालक कंपनी बाइटडान्सचे सह संस्थापक आणि सीईओ झांग यिमिंग(CEO Zhang Yiming) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. टिकटॉक कंपनीचे हक्क अमेरिकी कंपनीला(America company) विकण्यासाठी बायडेन(Joe Baiden) प्रशासनाकडून येणारा दबाव आणि अनिश्‍चित वातावरणाच्या स्थितीत झांग यांनी सीइओपद(CEO) सोपडले आहे. झांग यिमिंग यांनी म्हटले, की आपल्या अंगी व्यवस्थापन कौशल्याचा अभाव जाणवत असल्याने आपण पद सोडत आहोत. आता ते कंपनीत दुसऱ्या पदावर असतील. दुसरे सह संस्थापक लियॉंग रुबो हे बाइटडान्सचे नवीन सीईओ असतील.(Tiktok CEO resigns The loss was Rs 45300 crore)

आता त्यांच्याऐवजी कंपनीचे दुसरे सह-संस्थापक लियॉंग रुबो हे बाईटडन्सचे नवे सीईओ म्हणून नियुक्त होतील असे सांगण्यात येत आहे. सध्या ते कंपनीच्या एचआर विभागाचे प्रमुख आहे. त्याच वेळी, झांग यिमिंग कंपनीसाठी रणनीतिकार म्हणून काम करणार असेही सांगण्यात येत आहे.

Tiktok CEO resigns The loss was Rs 45300 crore
फ्रान्सचे माजी अध्यक्ष सरकोझी यांच्यावर खटला; 1 वर्षाची होऊ शकते शिक्षा

झांग यांनी कर्मचार्‍यांना लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे की, “अजूनही आपल्यात अनेक गोष्टी सुधारण्याची गरज आहे. मला वाटते या क्षेत्रामधील कोणीतरी या गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे चालवू शकेल. वास्तविकता अशी आहे की एक चांगला व्यवस्थापक होण्यासाठी माझ्याकडे अजूनही काही कौशल्याची कमतरता आहे."

ते म्हणाले, "लोकांचे व्यवस्थापन करण्याऐवजी मला संघटना आणि बाजाराच्या तत्त्वांचे विश्लेषण करण्यात अधिक रस आहे." झांग आणि लिआंग पुढील 6 महिने एकत्र काम करतील. जेणेकरून कपंनिच्या गोष्टी सुलभ होऊ शकतील.

Tiktok CEO resigns The loss was Rs 45300 crore
राहण्यालायक देशांच्या यादीत भारत सर्वात खालच्या स्थानावर; पण का?  

महत्त्वाचे म्हणजे चीनच्या सरकारने गेल्या महिन्यात वेगाने वाढणार्‍या टेक क्षेत्रावरील नियम कठोर केले आहेत. त्यावर दंडही लावण्यात आले आहे. दंड ठोठावण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये बाइटडांस कंपनीचाही समावेश आहे. या कंपन्यांवर मक्तेदारीचा आरोप आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com