Thailand News: थायलंडच्या पंतप्रधानांवर राजीनाम्याची टांगती तलवार, मुदत संपूनही...

Thailand Politics: थायलंडचे पंतप्रधान प्रयुथ चान-ओचा यांना राजीनामा देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालय देऊ शकते.
 Prime Minister Prayuth Chan-ocha
Prime Minister Prayuth Chan-ochaDainik Gomantak

Prime Minister Of Thailand: थायलंडचे पंतप्रधान प्रयुथ चान-ओचा (Prime Minister Prayuth Chan-ocha) यांना राजीनामा देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालय देऊ शकते. पदावर राहण्याची वैध मुदत संपल्यानंतरही ते पंतप्रधानपदाची खुर्ची सोडत नसल्याने न्यायालयाचा हा आदेश येऊ शकतो.

दरम्यान, प्रयुथ यांच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता आहे. परंतु ते अलोकतांत्रिक पद्धतीने सत्तेवर आल्याने त्यांच्या सरकारच्या (Government) विरोधात निदर्शने सुरु होण्याचा धोका आहे. न्यायालयाच्या (Court) आदेशाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या विरोधकांनी देशभर निदर्शने सुरु केली आहेत.

 Prime Minister Prayuth Chan-ocha
India-Thailand Ties: संयुक्त आयोगाची आज बैठक, जयशंकर म्हणाले – जग स्विकारतंय भारताची भूमिका

प्रवीत वोंगसुवान यांची कार्यवाहक पंतप्रधान म्हणून नियुक्ती

न्यायालयाने गेल्या महिन्यात प्रयुथ यांना पंतप्रधानपदाची जबाबदारी पार पाडण्यापासून रोखले होते. त्यानंतर उपपंतप्रधान प्रवीत वोंगसुवान यांना कार्यवाहक पंतप्रधान करण्यात आले, तर प्रयुथ हे संरक्षण मंत्री बनले. विशेष म्हणजे, प्रयुथ यांचा कार्यकाळ कसा मोजला जाईल, अशी विचारणा करणारी याचिका विरोधी खासदारांनी न्यायालयाच्या नऊ सदस्यीय खंडपीठासमोर दाखल केली होती.

 Prime Minister Prayuth Chan-ocha
Thailand: बँकॉकच्या नाईट क्लबमध्ये भीषण आग, 13 ठार, 35 जखमी

दुसरीकडे, तत्कालीन लष्कर जनरल प्रयुथ यांनी मे 2014 मध्ये निवडून आलेले सरकार उलथून टाकले आणि त्याच वर्षी ऑगस्टमध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. त्यांचा आठ वर्षांचा कार्यकाळ 24 ऑगस्ट रोजी संपुष्टात आल्याचे त्यांच्या टीकाकारांचे म्हणणे आहे.

त्याच वेळी, प्रयुथ यांच्या समर्थकांचा असा युक्तिवाद आहे की, अंतिम मुदतीशी संबंधित संविधानाची तरतूद 6 एप्रिल 2017 रोजी अंमलात आली, त्यामुळे त्यांच्या कार्यकाळाचा कालावधी त्या तारखेपासून मोजला जावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com