Pulitzer Prize 2024: पुलित्झर पुरस्कार 2024 जाहीर! शोध पत्रकारितेसाठी द न्यूयॉर्क टाइम्सच्या हॅना ड्रेयर यांचा सन्मान; वाचा संपूर्ण यादी

Pulitzer Prize 2024: अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाने पुलित्झर पुरस्कार बोर्डच्या शिफारशींवर अनेक श्रेणींमध्ये विजेत्यांची नावे जाहीर केली आहेत.
Pulitzer Prize 2024
Pulitzer Prize 2024Dainik Gomantak

Pulitzer Prize 2024: पुलित्झर पुरस्कार 2024 च्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाने पुलित्झर पुरस्कार बोर्डाच्या शिफारशींवर अनेक श्रेणींमध्ये विजेत्यांची नावे जाहीर केली आहेत. ब्रेंडन सोम यांना काव्यक्षेत्रात, तर द न्यूयॉर्क टाइम्सच्या हॅना ड्रेयर यांना शोध पत्रकारितेसाठी सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी पुढीलप्रमाणे...

पत्रकारितेतील हे विजेते

Public Service-Pro Publica Co: ही कॅलिफोर्नियातील एक नॉन प्रोफिटेबल शोध पत्रकारिता करणारी संस्था आहे. जोशुआ कॅप्लान, जस्टिन इलियट, ब्रेट मर्फी, ॲलेक्स मिर्झेव्स्की आणि कर्स्टन बर्ग या पत्रकारांच्या शोध पत्रकारितेसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.

  • द न्यूयॉर्क टाइम्सच्या हॅना ड्रेयर यांना शोध पत्रकारितेसाठी सन्मानित करण्यात आले आहे.

  • न्यू यॉर्क टाईम्स न्यूजपेपरच्या स्टाफला आंतरराष्ट्रीय रिपोर्टिंगसाठी पुरस्कृत करण्यात आले. दक्षिण इस्रायलमधील हमासचा 7 ऑक्टोबरचा प्राणघातक हल्ला, इस्रायलची गुप्तचर यंत्रणा आणि गाझामधील इस्रायली लष्करी कारवाई याविषयीच्या निर्भिड कव्हरेजसाठी वृत्तपत्राचा गौरव करण्यात आला.

  • वॉशिंग्टन पोस्ट वृत्तपत्राचे डेव्हिड ई. हॉफमन यांना संपादकीय लेखनासाठी सन्मानित करण्यात आले.

  • रॉयटर्स न्यूज एजन्सीच्या फोटोग्राफी टीमला ब्रेकिंग न्यूज फोटोग्राफीसाठी सन्मानित करण्यात आले.

  • असोसिएटेड प्रेस न्यूज एजन्सीच्या फोटोग्राफी टीमला फीचर फोटोग्राफीसाठी सन्मानित करण्यात आले.

  • इनविसिबले इंस्टीट्यूट आणि USG ऑडिओ स्टाफ यांना ऑडिओ रिपोर्टिंगसाठी सन्मानित करण्यात आले.

Pulitzer Prize 2024
Pulitzer Award: दानिश सिद्दीकी यांना मरणोत्तर पुलित्झर पुरस्कार जाहीर

फिक्शन आणि ड्रामामध्ये सन्मानित

अमेरिकन कादंबरीकार जीन ॲन फिलिप्स यांना फिक्शन स्टोरीमध्ये ‘नाइट वॉच’साठी सन्मानित करण्यात आले. तर अमेरिकन नाटककार इबोनी बूथ यांना त्यांच्या ‘प्रायमरी ट्रस्ट’ या नाटकासाठी सन्मानित करण्यात आले.

Pulitzer Prize 2024
pulitzer prize 2021 : भारतीय वंशाच्या पत्रकाराचा पुलित्झर पुरस्काराने गौरव 

आत्मचरित्र आणि कवितेसाठी त्यांचा गौरव करण्यात आला

लेखिका क्रिस्टिना रिवेरा गार्झा यांना त्यांच्या अप्रतिम संस्मरण आणि आत्मचरित्र, लिलियानाच्या अजिंक्य समर: अ सिस्टर्स सर्च फॉर जस्टिससाठी (Liliana’s Invincible Summer: A Sister’s Search for Justice) हा पुरस्कार मिळाला. तर कवितेसाठी, ब्रँडन सोम यांना त्यांच्या ‘त्रिपास’ या पुस्तकासाठी पुरस्कार देण्यात आला. यासोबतच, टायशॉन सोरे यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘अडागिओ’ या संगीतासाठी त्यांना संगीत क्षेत्रात सन्मानित करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com