लंडनमध्ये भारतीयांच्या हत्या सुरुच; आणखी एका व्यक्तीची हत्या, तीन दिवसांत दुसरी घटना

केंबरवेल आणि पेकहॅमचे खासदार हॅरिएट हरमन यांनी या मृत्यूचे वर्णन "भयंकर हत्या" असे केले आहे.
Crime News
Crime NewsDainik Gomantak

युनायटेड किंगडममध्ये शिकणाऱ्या हैदराबादच्या विद्यार्थीनीची हत्या झाल्यानंतर दोन दिवसांनी शुक्रवारी लंडनमध्ये एका भारतीय वंशाच्या व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली.

पोलिसांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळाल्यानंतर अधिकारी साउथहॅम्प्टन, केंबरवेल येथे त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा 38 वर्षीय भारतीय वंशाच्या अरविंद शसीकुमारचा मृतदेह सापडला.

गुरुवारी-शुक्रवारी रात्री 1.31 च्या सुमारास शसीकुमारचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी एक निवेदन जारी केले. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, अरविंद शसीकुमार यांच्या हत्येच्या आरोपाखाली 25 वर्षीय सलमान सलीमला दुसऱ्याच दिवशी शनिवारी अटक करण्यात आली.

Crime News
Google Doodle: भारताच्या पहिल्या शास्त्रज्ञ कमला सोहोनी यांच्या 112 व्या जयंतीनिमित्त गूगलने बनवले खास डूडल

आरोपीला त्याच दिवशी क्रॉयडॉन मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर केले असता २० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. इव्हनिंग स्टँडर्ड या वृत्तपत्राने म्हटले आहे की, शुक्रवारी केलेल्या पोस्टमॉर्टममध्ये शशीकुमार यांचा छातीवर वार झाल्याने मृत्यू झाल्याची पुष्टी झाली. केंबरवेल आणि पेकहॅमचे खासदार हॅरिएट हरमन यांनी या मृत्यूचे वर्णन "भयंकर हत्या" असे केले आणि पीडितेच्या कुटुंबाप्रती सहानुभूती व्यक्त केली.

Crime News
PM Modi in USA : मोदी अमेरिकेत, तर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री चीनमध्ये! जागतिक राजकारण ढवळून निघणार

नुकतेच दोन भारतीय मुलींची हत्या

यापूर्वी हैदराबादमध्ये राहणाऱ्या 27 वर्षीय तेजस्विनी कोंथनची तिच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या ब्राझीलच्या व्यक्तीने चाकूने भोसकून हत्या केली होती. ही घटना 14 जून रोजी नील क्रिसेंट, नॉर्थ लुंड येथील घरात घडली. या हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती. त्याच दिवशी दुसऱ्या एका घटनेत १९ वर्षीय ब्रिटीश भारतीय तरुणीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. जेव्हा ती तिचा मित्र बर्नाबी बाबरसोबत नाईट आऊटवरून परतत होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com