ब्रिटनमध्ये लॉकडाऊनच्या निर्बंधात आणखी सूट 

Further relaxation of lockdown restrictions in the UK
Further relaxation of lockdown restrictions in the UK

लंडन:  ब्रिटनमध्ये (Britain) चार महिन्यांच्या लॉकडाऊन (lockdown) नंतर आज पुन्हा एकदा निर्बंधात आणखीन शिथीलता देण्यात आली आहे. यामुळे येथील जनतेला दिलासा मिळाला आहे.  ब्रिटनमध्ये आजपासून थिऐटर,  म्युझियम (Museum), लहान मुलांच्या खेळण्याच्या जागा यांना खुले करण्याची परवानगी देण्यात आली आहे. येथील लोक आता एकमेकांच्या घरी जाऊन भेटू शकतात. तसेच खेळाचे सामने पाहण्यासाठी, कार्यक्रम आणि मनोरंजनासाठी लोकांना मोठ्या संख्येने एकत्र येण्याची मुभा देण्यात आली आहे. Further relaxation of lockdown restrictions in the UK

याआधी येथे प्रवासासाठी सुट देण्यात आली होती, त्यानंतर आज येथील लॉकडाऊनमध्ये आणखीन सूट देण्यात आली आहे. निर्बंधात शिथीलता आणली असली तरी आठवड्यातून दोन वेळा कोरोना चाचणीचा नियम, लग्न समारंभात 30 लोकांची उपस्थिती हे नियम कायम ठेवण्यात आले असले तरी ब्रिटन सरकार 21 जूनपर्यंत लॉकडाऊन संपविण्याच्या तयारीत आहे. 

ब्रिटनच्या पंतप्रधानांनी भारतातील कोरोना महामारीच्या बदलत्या स्वरुपावर लक्ष देण्याचे आदेश देखील दिले आहेत. इंग्लंडचे चीफ मेडीकल ऑफिसर प्रोफेसर क्रिस विटी यांनी सांगितले, भारतात सध्या आसलेला कोरोना महामारीचा प्रकार घातक असून तो ब्रिटनमध्ये अजूनही आहे. त्यामुळे आपल्याला सर्तक राहण्याची आवश्यकता आहे. कारण हा प्रकार जास्त घातक असून, तो देशातील अनेक भागात खूप लवकर पसरु शकतो. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com