अवघ्या 100 रुपयांना विकले 6.6 कोटींचे फ्लॅट, कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का!

अनेक लोकांसाठी घर घेण्याचे स्वप्न फक्त 'स्वप्न' च राहते. केवळ भारतातच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात मालमत्तेच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
Flat
FlatDainik Gomantak

अनेक लोकांसाठी घर घेण्याचे स्वप्न फक्त 'स्वप्न' च राहते. केवळ भारतातच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात मालमत्तेच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. पण ही बातमी वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. ब्रिटनमध्ये करोडो किमतीचे फ्लॅट केवळ 100 रुपयांना विकले गेले. हे ऐकल्यानंतर तुमचा विश्वास बसणार नाही, पण ही सत्य घटना आहे.

डेली एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, ब्रिटनमध्ये 6.6 कोटी रुपयांचे महागडे फ्लॅट केवळ 100 रुपयांना विकले गेले आहेत. परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला आहे, जेणेकरुन लोकांना लुईस टाऊनमध्ये राहण्याच्या उच्च खर्चापासून मुक्त करता येईल. या प्रक्रियेचा एक भाग म्हणून, कम्युनिटी लँड ट्रस्टने एकूण 11 सदनिका विकण्याचे मान्य केले आहे आणि आता या मालमत्तांचे नूतनीकरण करण्यासाठी एक दशलक्ष पौंडांपेक्षा जास्त रक्कम देऊ केली आहे.

Flat
Elon Musk: एलन मस्कसोबत अफेअरच्या चर्चा, गुगलच्या सह संस्थापकाच्या पत्नीला घटस्फोट

दरम्यान, या सदनिका खुल्या बाजारात विकल्या जात नसल्याचे डिप्टी काउन्सिल लीडर डेव्हिड हॅरिस यांनी सांगितले. असे झाले असते तर येथील परवडणाऱ्या घरांच्या तरतुदीचे उल्लंघन झाले असते. ही अशी जागा आहे जिथे घरे भाड्याने तसेच मालकीहक्कावर दिली जातात. हॅरिस पुढे म्हणाले की, कम्युनिटीच्या नेतृत्वाखालील पुनर्विकास योजना हे सुनिश्चित करेल की सदनिका परवडणाऱ्या घरांच्या तरतुदीसाठी वापरल्या जातील. इथली बहुतेक घरं अशी आहेत जिथे लोक सुट्टीसाठी येतात.

Flat
Elon Musk : एलन मस्क पुन्हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

दुसरीकडे, 2021 मध्ये कॉर्नवॉल लाइव्हने अहवाल दिला की, काऊंटीमधील 13,000 पेक्षा जास्त मालमत्तांना सेकंड होम म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे, म्हणजे ही घरे त्यांच्या मालकांचे दुसरे निवासस्थान म्हणून काम करतात. हे सुट्ट्या आणि इतर प्रवासादरम्यान वापरली जातात. नॉर्थ रोड बिल्डिंग काउन्सिलने 2021 मध्ये त्याचे वर्णन 'आर्थिक नुकसान' आणि आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च म्हणून केले. त्यामुळे जास्त देखभाल खर्च टाळण्यासाठी सदनिका विकल्या जात आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com