इस्रायलमध्ये उत्खननात मिळाला 1900 वर्षांपूर्वीचा मानवी मुखवट्याचा दिवा 

brass oil lamp.jpg
brass oil lamp.jpg

इस्रायलमध्ये (Israel)  गेल्या काही दिवसांपासून प्रचंड हिंसा भडकली आहे. सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे. मात्र अशातच इस्रायलीसंशोधकांना संशोधनात एकअनोखी वस्तु मिळाली आहे.  इस्त्रायलमधील जेरुसलेम (Jerusalem) येथील डेव्हिड नॅशनल पार्कमध्ये एक प्राचीन पितळाचा तेलाचा दिवा (Brass Oil lamp) मिळाला आहे.   हा पितळ दिवा अंदाजे 1900 वर्ष जुना आहे. तसेच  दिव्यांवरील कलाकृतीचा आकार हसणार्‍या मानवी चेहऱ्यासारखा आहे. संशोधकांनी या दिव्याचे वर्णन 'अत्यंत विशेष' असे केले आहे. तसेच इस्राईलमधील प्रकारातील पहिलाच, असेही या दिव्याला म्हटले आहे. इस्रायली पुरातत्व विभागाचे (Department of Archeology)  डॉ. बारूच आणि त्यांच्या सहकाऱ्यांना उत्खननात (Excavation)  हा दिवा  सापडला आहे.  (Excavations in Israel have uncovered a 1900-year-old human mask lamp) 

या दिव्यांचे वेगळेपण म्हणजे रोमन थिएटरमध्ये वापरल्या जाणार्‍या मुखवटयांप्रमाणे हा दिवा आहे. वास्तविकत: या दिव्याचा केवळ अर्धाच  भाग राहीला आहे, त्याचसोबत यात ज्युटपासून बनवलेली वात मिळाल्याचे संगीतले आहे. तर हा दिवा सपाट जागेवर किंवा भिंतीवर टांगलेला असावा, आणि  हा दिवा धार्मिक समारंभात वापरला गेला असावा, अशी शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.  याशिवाय, इमारतीत राहणारे लोक  अशा प्रकार च्या दिव्यांचा वापर चांगल्या नाशिबासाठी करत असत. तथापि, हा दिवा मिळाल्यानंतर संशोधकांनी हंगेरीतील पुरातत्व वाद्यांना दाखविला.  तेलाच्या दिव्याचा हा भाग बुडापेस्टमधील रोमन अवशेषांमध्ये  शोधलेल्या दिव्याचा दुसरा भाग असू शकतो. असे पुरातत्व विभागाच्या डॉ. अँनी  लेवी  यांनी सांगितले आहे. 

प्राथमिक तपासणीत एकाच प्रकारचे दोन दिवे असल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारचे दिवे वल्हांडण, शवौत आणि सुकोट सणांच्या वेळी प्राचीन यहूदी डोंगरावरील मंदिरात जाण्यासाठी या दिव्यांचा वापर करत.  आता दुसऱ्या  ठिकाणी आढळून आलेल्या दिव्याशी  या दिव्याचे भाग जोडण्यासाठी इस्त्रायली पुरातत्वशास्त्रज्ञ आता या दिव्याचे थ्रीडी मॉडेल बनविण्यावर विचार करत आहेत आणि त्यासाठी ते या दिव्याचे अवशेष  हंगेरीला पाठवणार आहेत. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com