शेणाच्या गवऱ्या घेऊन भारतीय अमेरिकेत

cow-dung-cakes
cow-dung-cakes

भारतीय व्यक्ति कोठेही गेले तरी त्याच नातं हे आपल्या देशाशी जोडलेले असते. परदेशात जाताना भारतीय व्यक्ति आपल्या गावातील अनेक वस्तु सोबत घेऊन जातात. अनेक विमानतळावर (Airport) तपासणी केल्यास या वस्तु अडचणी निर्माण करू शकतात. अशीच घटना सामाजिक माध्यमांवर (Social media) खूप व्हायरल  होत आहे.  आंतरराष्ट्रीय विमानतळावर (International Airport) भारतातून आलेल्या प्रवाशाच्या सामानातून अमेरिकेच्या सीमाशुल्क सीमा आणि सीमा सुरक्षा अधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतातून आलेल्या प्रवाशाच्या सामानातून शेणाच्या गवऱ्या (cow dung cakes) ताब्यात घेतल्या. (Cow dung cakes found inside Indian passenger's bag at Washington Airport)

भारतात प्रत्येक गावात-खेड्यामध्ये गोवऱ्याचा वापर घर सारवण्यासाठी, सकाळी अंगणात सडा टाकण्यासाठी असे अनेक कामासाठी  वापर केला जातो. अशाच काही कामासाठी या भारतीयाने गवऱ्या अमेरिकेला नेल्या असाव्यात.  अमेरिकेमध्ये शेणाच्या गोवऱ्यावर बंदी आहे, अशी माहिती अधिकाऱ्यानी दिली आहे. याचे कारण म्हणजे गोवऱ्यानामुळे प्राण्यांमधील संसर्गजन्य तसेच प्राणघातक असलेल्या (Foot-and-mouth disease) आजारचा फैलाव होतो. हा आजार प्राण्याना होतो. त्यामुळे प्राण्यांच्या मालकाला देखील हा आजार होऊ शकतो.  त्यामुळे सीमाशुल्क आणि सीमा सुरक्षा विभागाच्या कृषि विभागाच्या मोहिमेला धोका निर्माण झाला असता. त्यामुळे सीमाशुल्क आणि सीमा सुरक्षा अधिकाऱ्यांनी शेणाच्या गवऱ्या नष्ट केल्या आहेत. 

चार अप्रिलला एयर इंडियाच्या विमानातून परत आलेल्या एका प्रवाशाच्या सुटकेसमध्ये दोन शेणाच्या गवऱ्या सापडल्या होत्या. त्या गोवऱ्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. कस्टम आणि बॉर्डर प्रोटेक्शनच्या (Custom and Border Protection) माहितीनुसार जगात अनेक ठिकाणी शेणाच्या गोवऱ्याचा स्वयंपाक करण्यासाठी इंधन म्हणून वापर केला जातो आणि तो एक महत्वाचा भाग आहे. general 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com