Viral Video: 3 सेकंदाची मेहनत अन् महिलेने एका आठवड्यात कमावले 120 कोटी; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...!

China Woman: सध्या तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या युगात ऑनलाइन कमाईची अनेक साधने समोर आली आहेत.
China Woman
China WomanDainik Gomantak

China Woman Earns Rupees 120 Crore Every Week:

सध्या तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या युगात ऑनलाइन कमाईची अनेक साधने समोर आली आहेत. लाखो लोक YouTube, Facebook, TikTok आणि Instagram सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ पोस्ट करुन दररोज चांगले पैसे कमवत आहेत. काही यशस्वी लोकांची कमाई करोडो रुपयांपर्यंत पोहोचली आहे. चीनच्या एका महिलेने (Woman) असेच करुन एका आठवड्यात 120 कोटी रुपये कमावले आहेत.

दरम्यान, ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अनोखा व्हिडिओ कंटेंट तयार करुन चिनी महिला झेंग जियांग आज सोशल मीडियावर (Social Media) प्रसिद्धी मिळवत आहे. यामुळे तिचे फॉलोअर्स तर वाढलेच पण तिने करोडो रुपयेही कमावले. झेंग जियांगने चीनच्या ऑनलाइन उत्पादनाच्या जाहिरातीमध्ये क्रांती घडवून आणली आहे. चिनी टिकटोक नावाच्या प्लॅटफॉर्मवर जियांगचे 5 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती या प्लॅटफॉर्मवर काही सेकंदात ऑनलाइन प्रोडक्ट दाखवते आणि फक्त तीन सेकंदात त्याच्याबद्दल सांगते. विशेष म्हणजे, हे तिच्या यशाचे गमक आहे.

इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये जियांग अनेक कपड्यांच्या प्रोडक्टची ऑनलाइन माहिती देताना दिसत आहे. यादरम्यान एका प्रोडक्ट्सबद्दल ती तीन सेकंदांपेक्षा जास्त वेळ सांगत नाही. व्हिडिओमध्ये असे दिसते की, तिच्या समोर एक एक प्रोडक्ट्स आणली जात आहेत आणि ती त्याच्याबद्दल सांगत आहे. हे करण्यासाठी तिला फक्त तीन सेकंद लागतात. काही प्रोडक्टसबद्दल ती अवघ्या दोन सेकंदात सांगते.

लाइव्ह स्ट्रिमिंग दरम्यान, झेंग जियांगचा सहाय्यक त्याला एक एक करुन विविध वस्तूंनी भरलेला केशरी बॉक्स देतो. मिलिसेकंदांत, ती प्रत्येक प्रोडक्ट उचलते आणि कॅमेऱ्यासमोर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगते. हे सर्व फक्त तीन सेकंदात (प्रति उत्पादन) घडते. ग्राहकांचे मन वळवण्याच्या आणि प्रोडक्टची माहिती देण्याच्या तिच्या अनोख्या स्टाईलमुळे ती दर आठवड्याला सुमारे 120 कोटी रुपये कमावत आहे. अल्पावधीत प्रोडक्ट वितरीत करण्याच्या तिच्या शैलीने चीन ग्राहकांना प्रभावित केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com