Karnataka Elections 2023: 'आम्हाला मुस्लिम मतांची गरज नाही...', कर्नाटक निवडणुकीपूर्वी भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

BJP Leader KS Eshwarappa: याआधी राज्यात भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री केएस ईश्वरप्पा यांनी वादग्रस्त विधान केले आहे.
BJP Leader KS Eshwarappa
BJP Leader KS EshwarappaDainik Gomantak

Karnataka Elections 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी मतदान होत आहे. याआधी राज्यात भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री केएस ईश्वरप्पा यांनी वादग्रस्त विधान केले आहे.

विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतांची गरज नाही, असे ते म्हणाले. कर्नाटक निवडणुकीपूर्वीच ईश्वरप्पा यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपला शिवमोग्गा शहरातील 60 हजार मुस्लिमांच्या मतांची गरज नाही, असे ईश्वरप्पा म्हणाले. खरे तर, 24 एप्रिल रोजी ईश्वरप्पा यांनी कर्नाटकातील (Karnataka) शिवमोग्गाजवळील विनोबा नगरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित केले होते.

यावेळी ते म्हणाले की, 'सर्व जातीधर्माच्या लोकांशी बोलून त्यांना भाजप सरकारच्या काळात कोणते फायदे मिळाले आहेत, हे जाणून घेतले पाहिजे. शहरात जवळपास 60 हजार मुस्लिम आहेत, आम्हाला त्यांच्या मतांची गरज नाही.'

BJP Leader KS Eshwarappa
Karnataka Election 2023: 'मोदी देव आहेत...', म्हणत देवनहळ्ळीतील ग्रामस्थाने केलेल्या कृतीचा व्हिडिओ व्हायरल

ईश्वरप्पा पुढे त्यांच्या भाषणादरम्यान म्हणाले की, 'अर्थात असे अनेक मुस्लिम आहेत, ज्यांना भाजप सरकारचा वैयक्तिक फायदा झाला. गरजेच्या वेळी त्यांना मदत मिळाली, ते आम्हाला मतदान करतील. राष्ट्रवादी मुस्लिम (Muslim) भारतीय जनता पक्षालाच मतदान करतील.'

ईश्वरप्पा यांनी जाहीर सभेपूर्वी केलेल्या भाषणात असेही सांगितले की, 'त्यांच्या सरकारमध्ये कोणत्याही हिंदूला कोणतीही अडचण आली नाही, ते सुरक्षित आहेत. त्यांच्यावर हल्ला करण्याचे धाडस कोणी केले नाही.'

BJP Leader KS Eshwarappa
Karnataka Assembly Elections 2023: आमदार तुयेकर यांच्याकडे भटकळ मतदारसंघाची जबाबदारी

ईश्वरप्पा पुढे म्हणाले की, 'भाजप सरकारमध्ये हिंदू सुरक्षित होते. हिंदूंवर हल्ला करण्याची कोणाची हिंमत नव्हती. भाजप सरकार जिंकले नाही तर हिंदू तितके सुरक्षित राहणार नाहीत, जितके ते भाजपच्या राजवटीत जगत आहेत.'

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकमध्ये 10 मे रोजी विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणूक एकाच टप्प्यात पार पडणार आहे. त्यानंतर 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com