शेतकऱ्यांकडून 'पंतप्रधान मोदीं'च्या 'मन की बात'चा थाळ्या वाजवून निषेध

Protesting farmers beat Thalis to condemn Mann Ki Baat Radio Programme by P M Narendra Modi
Protesting farmers beat Thalis to condemn Mann Ki Baat Radio Programme by P M Narendra Modi

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रविवारच्या मन की बात कार्यक्रमावेळी शेतकऱ्यांनी थाळी वाजवून आपला निषेध व्यक्त केला. नव्या कृषी कायद्यांना विरोध म्हणून हे अनोखे आंदोलन शेतकऱ्यांनी आज केले. गेल्या ३२ दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत.

कोरोनाच्या काळात थाळ्या वाजविण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले होते. त्याचप्रमाणे थाळ्या वाजवून केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांना आम्ही पळवून लावणार आहोत, अशी प्रतिक्रिया भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी दिली. क्रांतिकारी किसान  युनियनचे अध्यक्ष दर्शन पाल म्हणाले, की पंजाब आणि हरियानातील टोल खुले करण्यात येतील. येत्या बुधवारी (ता. ३०) सिंघू सीमेवरून ट्रॅक्टर मार्च काढण्यात येईल. देशभरातील नागरिकांना येथे येऊन० आमच्या समवेत नव्या वर्षांचे स्वागत करावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com