''PM मोदींनी 2002 मध्ये धडा शिकवला...'', अमित शाह यांनी गुजरात दंगलीची करुन दिली आठवण

Union Home Minister Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी गुजरातमधील साणंद येथे विकास भारत संकल्प यात्रेदरम्यान जनतेला संबोधित केले.
Union Home Minister Amit Shah
Union Home Minister Amit ShahDainik Gomantak

Union Home Minister Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी गुजरातमधील साणंद येथे विकास भारत संकल्प यात्रेदरम्यान जनतेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2002 मध्ये मुख्यमंत्री असताना गुजरातमधील दंगलखोरांना असा धडा शिकवला की, आजपर्यंत राज्यात पुन्हा दंगल घडवण्याचे धाडस कोणी केले नाही.'' कलम 370 एका क्षणात रद्द करणे आणि प्रभू रामाचे मंदिर बांधण्याचे श्रेयही शाह यांनी पंतप्रधान मोदींना दिले. ते पुढे म्हणाले की, एकेकाळी प्रभू राम 'तंबूत' राहत होते.

शाह पुढे म्हणाले की, “2002 मध्ये दंगल झाली आणि त्यानंतर पुन्हा असे होऊ नये यासाठी मोदीजींनी धडा शिकवला. त्यानंतर दंगली झाल्या का? 2002 मध्ये दंगलखोरांना असा धडा शिकवला गेला की, आजपर्यंत गुजरातमध्ये दंगल करण्याचे धाडस कोणाचे झाले नाही.'' साणंद ग्रामपंचायतीतील एका कार्यक्रमात बोलताना शाह यांनी अनेक महत्त्वाची विधाने केली. गुलामगिरीची मानसिकता उखडून टाकण्याबरोबरच शाह म्हणाले की, 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचा संकल्प मोदी सरकारचा आहे.

Union Home Minister Amit Shah
Amit Shah S. Jaishankar Threatened by Khalistani: अमित शाह आणि एस जयशंकर यांना धमकी, खलिस्तानी दहशतवादी पन्नूकडून 1.25 लाख डॉलरचे बक्षीस जाहीर

पाकिस्तानला धडा शिकवल्याबद्दल, अयोध्येत राम मंदिर बांधणे, चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग आणि कलम 370 रद्द केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना शाह म्हणाले की, "पूर्वी दररोज बॉम्बस्फोट व्हायचे, परंतु प्रिंट पत्रकार ते छापाचे विसरुन जायचे. असे अनेक स्फोट झाले ज्यांचा अंत नव्हता. परंतु सर्जिकल आणि एअर स्ट्राईक करुन आम्ही पाकिस्तानला धडा शिकवला... नरेंद्रभाईंनी देश सुरक्षित केला आहे."

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, शाह म्हणाले की, “मोदीजींनी सरदार पटेल आणि श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचे स्वप्न एका झटक्यात पूर्ण केले… भगवान राम 500 वर्षांपासून तंबूत राहत होते, परंतु त्यांच्यासाठी मंदिर बांधता आले नाही. नरेंद्रभाईंनी मंदिर बांधण्याचे काम पूर्ण केले. संपूर्ण जग चंद्रावर पोहोचले पण आपला ध्वज पोहोचू शकला नाही. नरेंद्रभाईंनी चांद्रयान चंद्रावर पाठवले आणि शिवशक्ती पॉईंटवर आपला तिरंगा फडकवला. त्याचबरोबर त्यांनी आर्थिक आघाडीवरही देशाला एक नवी उंची प्रदान करुन दिली. देशाच्या अर्थव्यवस्थेतील सर्व पॅरामीटर्स गेल्या 75 वर्षातील सर्वोत्तम स्तरावर आहेत. 10 वर्षांचे अंतर पाहिले तर नरेंद्रभाईंच्या कार्यकाळात सर्वाधिक औद्योगिक विकास झाला आहे.''

Union Home Minister Amit Shah
Amit Shah On Article 370 : "राहुल बाबा, काश्मीरमधून कलम 370 तर हटवलेच, पण कोणी..." अमित शाह यांचा राहुल गांधींना टोला

शाह शेवटी म्हणाले की, "आपल्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या भगतसिंग, खुदीराम बोस, राणी लक्ष्मीबाई यासांरख्या हुतात्म्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची हीच वेळ आहे." शाह यांनी तरुणांना त्याच दिशेने काम करण्याचे आवाहन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com