Diwali In New York: दिवाळीला मिळणार सरकारी सुट्टी ! न्यूयॉर्क विधानसभेत प्रस्ताव

दिवाळीसोबतच न्यूयॉर्कमध्ये लूनर न्यू ईयरलाही (Lunar New Year) अधिकृत सुट्ट्या देण्याचाही प्रस्ताव आहे.
Bill presented in New York State Assembly for Diwali holidays.
Bill presented in New York State Assembly for Diwali holidays.Dainik Gomantak

Diwali Celebration In America

अमेरिकेत भारतीय वंशाच्या लोकांच्या वाढत्या प्रभावामुळे, भारतातील सर्वात मोठा सण दिवाळीसाठी सरकारी सुट्टी घोषित करण्याची तयारी सुरू आहे. न्यूयॉर्कच्या विधानसभेत याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यानंतर दिवाळीची सुट्टी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दिवाळी सणाची सुट्टी जाहिर झाल्यास अनेक सिनेटर्सच्या वर्षानुवर्षे केलेल्या प्रयत्नांना यश येईल. दिवाळीसोबतच न्यूयॉर्कमध्ये लूनर न्यू ईयरलाही (Lunar New Year)  अधिकृत सुट्ट्या देण्याचाही प्रस्ताव आहे.

न्यूयॉर्क विधानसभेचे अध्यक्ष कार्ल हॅस्टी यांनी एका निवेदनात म्हटले की, न्यूयॉर्कची समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृती ओळखणे महत्त्वाचे आहे. न्यूयॉर्कची समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृती ओळखण्यासाठी हे केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

त्यामुळे आमचे विधानसभेचे अधिवेशन संपण्यापूर्वी लूनर न्यू ईयर आणि दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर करण्याचा विधानसभेचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. शाळेच्या वार्षिक कॅलेंडरमध्ये कोणते बदल करता येतील याबाबत आम्ही संबंधितांशी चर्चा करत राहू. विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी 8 जून रोजी यासंदर्भात निर्णय अपेक्षित आहे.

न्यूयॉर्क विधानसभेचे अधिवेशन 8 जूनपर्यंत चालणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अधिवेशन संपण्यापूर्वी प्रस्ताव मंजूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रस्तावाला दिवाळी डे (Diwali Day Law) असे नाव देण्यात आले आहे, ज्या अंतर्गत न्यूयॉर्कमधील दिवाळीची सुट्टी 12वी फेडरली मान्यताप्राप्त सुट्टी म्हणून घोषित केली जाईल.

याचा अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या समुदायाला खूप फायदा होईल आणि ते आपल्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसोबत दिवाळीचा सण साजरा करू शकतील.

Bill presented in New York State Assembly for Diwali holidays.
UP Police Encounter : धक्कादायक आकडेवारी! दर पंधरा दिवसाला उत्तर प्रदेश पोलिसांची गोळी घेतेय एकाचा जीव

न्यूयॉर्क विधानसभा सदस्य जेनिफर राजकुमार आणि सिनेटर जो अडाबो यांनी न्यूयॉर्क शहरातील शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली आहे. न्यूयॉर्क स्टेट कौन्सिलचे सदस्य शेखर कृष्णन आणि कौन्सिलवुमन लिंडा ली यांनीही या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे.

अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया राज्यात यापूर्वीच दिवाळी सणासाठी सुट्टीचा कायदा करण्यात आला आहे. एका अहवालानुसार, पेनसिल्व्हेनिया राज्यात 2 लाखांहून अधिक दक्षिण आशियाई लोक राहतात. या सर्वांमध्ये दिवाळी हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दरम्यान सर्वजण दिवाळीच्या उत्सवात सहभागी होतात.  

Bill presented in New York State Assembly for Diwali holidays.
Indian Students In Australia: मोदी परतताच ऑस्ट्रेलियाचा भारताला झटका; पंजाब-युपीसह चार राज्यांतील विद्यार्थ्यांवर बंदी

आता न्यूयॉर्क राज्यातही दिवाळीसाठी सरकारी सुट्टी मिळणार असल्याने इथाल्या भारतीयांना याला मोठा लाभ होणार आहे. आणि आपला लाडका सण साजरा करता येणार आहे. अमेरिकेचे सर्वांना सामावून घेण्याचे धोरण पहाता हा कायदा लवकरच अंमलात येईल यात शंका नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com