राष्ट्रीय स्पर्धा पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये घ्यावी

National games should be held in November next year

पणजी : गोव्यात या वर्षी नियोजित असलेली ३६वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोरोना विषाणू महामारीमुळे लांबणीवर टाकण्यात आली. पुढे गेलेली स्पर्धा राज्य सरकारने २०२१ साली नोव्हेंबर महिन्यात घेण्याची मागणी गोवा ऑलिंपिक असोसिएशनने (जीओए) केली आहे. यासंबंधीचा ठराव रविवारी संघटनेच्या वार्षिक आमसभेत एकमताने मंजूर करण्यात आला.

गोव्यात पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये राष्ट्रीय स्पर्धा घेण्याविषयी जीओए गोवा सरकारला विनंती करेल. केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक जीओएचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जीओएचे शिष्टमंडळ राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना लवकरच भेटणार आहे. या भेटीत स्पर्धा पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये घेण्याविषयी, तसेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाविषयक अपूर्णावस्थेत असलेल्या सुविधा तातडीने पूर्ण करण्याविषयी आणि संबंधित प्रलंबित विषय तातडीने मार्गी लावण्यासंबंधी मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात येईल. यासंबंधी रविवारी झालेल्या आमसभेत निर्णय घेण्यात आला. आयुषमंत्री श्रीपाद यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा झाली. यावेळी सचिव गुरुदत्त भक्ता, खजिनदार परेश कामत, इतर पदाधिकारी व संलग्न संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कोरोना विषाणू महामारीमुळे केंद्र सरकारच्या निर्देशानुसार गोवा सरकारने ३६वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकली आहे. ही स्पर्धा या वर्षी २० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत होणार होती. पुढे ढकलण्यात आलेली ही स्पर्धा भविष्यात कधी होईल याबाबत अजून स्पष्टता नाही. कोविड-१९ मुळे यावर्षी जपानमधील टोकियो येथे या वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये होणार असलेली ऑलिंपिक स्पर्धाही लांबणीवर टाकण्यात आली. टोकियो ऑलिंपिक स्पर्धा पुढील वर्षी २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत नियोजित आहे. टोकियो ऑलिंपिकनंतर गोव्यातील राष्ट्रीय स्पर्धा होऊ शकते. कोविडमुळे भारतात अजून मोठ्या क्रीडा स्पर्धांना सुरवात झालेली नाही. नोव्हेंबरमध्ये गोव्यात जैवसुरक्षा वातावरणात सातवी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धा रिकाम्या स्टेडियमवर खेळली जाईल. 

जीओएच्या रविवारच्या वार्षिक आमसभेत गतवर्षी १० ऑगस्टला झालेल्या मागील वार्षिक आमसभेच्या इतिवृत्तास मान्यता देण्यात आली. २०१९-२० वर्षाचा अहवाल सादर केला. बैठकीत २०१९-२० आर्थिक वर्षाचे लेखा परीक्षित अंदाजपत्रक सादर करून त्यास मान्यता मिळविण्यात आली. २०२०-२१ आर्थिक वर्षासाठी लेखा परीक्षकही आमसभेत नियुक्त करण्यात आला. २०२१ वर्षासाठी १० खेळाडूंना ३०००० रूपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले. गोव्यात या वर्षी नियोजित असलेली ३६वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोरोना विषाणू महामारीमुळे लांबणीवर टाकण्यात आली. पुढे गेलेली स्पर्धा राज्य सरकारने २०२१ साली नोव्हेंबर महिन्यात घेण्याची मागणी गोवा ऑलिंपिक असोसिएशनने (जीओए) केली आहे. यासंबंधीचा ठराव रविवारी संघटनेच्या वार्षिक आमसभेत एकमताने मंजूर करण्यात आला.

गोव्यात पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये राष्ट्रीय स्पर्धा घेण्याविषयी जीओए गोवा सरकारला विनंती करेल. केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक जीओएचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जीओएचे शिष्टमंडळ राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना लवकरच भेटणार आहे. या भेटीत स्पर्धा पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये घेण्याविषयी, तसेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाविषयक अपूर्णावस्थेत असलेल्या सुविधा तातडीने पूर्ण करण्याविषयी आणि संबंधित प्रलंबित विषय तातडीने मार्गी लावण्यासंबंधी मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात येईल. यासंबंधी रविवारी झालेल्या आमसभेत निर्णय घेण्यात आला. आयुषमंत्री श्रीपाद यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा झाली. यावेळी सचिव गुरुदत्त भक्ता, खजिनदार परेश कामत, इतर पदाधिकारी व संलग्न संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कोरोना विषाणू महामारीमुळे केंद्र सरकारच्या निर्देशानुसार गोवा सरकारने ३६वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकली आहे. ही स्पर्धा या वर्षी २० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत होणार होती. पुढे ढकलण्यात आलेली ही स्पर्धा भविष्यात कधी होईल याबाबत अजून स्पष्टता नाही. कोविड-१९ मुळे यावर्षी जपानमधील टोकियो येथे या वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये होणार असलेली ऑलिंपिक स्पर्धाही लांबणीवर टाकण्यात आली. टोकियो ऑलिंपिक स्पर्धा पुढील वर्षी २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत नियोजित आहे. टोकियो ऑलिंपिकनंतर गोव्यातील राष्ट्रीय स्पर्धा होऊ शकते. कोविडमुळे भारतात अजून मोठ्या क्रीडा स्पर्धांना सुरवात झालेली नाही. नोव्हेंबरमध्ये गोव्यात जैवसुरक्षा वातावरणात सातवी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धा रिकाम्या स्टेडियमवर खेळली जाईल. 

जीओएच्या रविवारच्या वार्षिक आमसभेत गतवर्षी १० ऑगस्टला झालेल्या मागील वार्षिक आमसभेच्या इतिवृत्तास मान्यता देण्यात आली. २०१९-२० वर्षाचा अहवाल सादर केला. बैठकीत २०१९-२० आर्थिक वर्षाचे लेखा परीक्षित अंदाजपत्रक सादर करून त्यास मान्यता मिळविण्यात आली. २०२०-२१ आर्थिक वर्षासाठी लेखा परीक्षकही आमसभेत नियुक्त करण्यात आला. २०२१ वर्षासाठी १० खेळाडूंना ३०००० रूपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com