Gujarat Fire Video: गुजरातच्या भरुच GIDC मध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल

गुजरातमधील भरूच GIDC मध्ये भीषण आग लागली आहे.
Gujarat Fire Video
Gujarat Fire VideoDainik Gomantak

Gujarat Fire Video: गुजरातमधील भरूच GIDC मध्ये भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाचे एक पथक घटनास्थळी हजर झाले आहे. आगीच्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

भरूच जीआयडीसीमधील एका पॅकेजिंग कंपनीत भीषण आग लागल्याची माहिती मिळाली आहे. आगीच्या ज्वाळा पाहून परिस्थिती भीषण असू शकते हे समजते.

अग्निशमन दलाच्या पाचहून अधिक गाड्या घटनास्थळी हजर झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक माहितीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. अद्याप आगीचे कारण समजु शकले नाही.

गेल्या आठवड्यात वलसाड जिल्ह्यातील वापी भागातील जीआयडीसीमधील केमिकल कंपनीला भीषण आग लागली होती. आगीत शेजारील दोन कंपन्या जळून खाक झाल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com