West Bengal Election 2021: "कूचबिहारचा हिंसाचार, हे अमित शहांच षडयंत्र होत"

kochbihar.jpg
kochbihar.jpg

पश्चिम बंगालमध्ये आता पर्यंत झालेल्या वेगवगेळ्या निवडणुकांचा इतिहास पाहता पश्चिम बंगालमध्ये निवडणूका आणि हिंसा हे समीकरण ठरलेले असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यातच आज मतदान सुरु असताना कूच बिहार जिल्ह्यातील मतदान केंद्राबाहेर एका युवकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली आणि त्यानंतर दोन गटांत मोठी चकमक झाल्याची माहिती पोलिसांनी ही दिली आहे. तसेच या चकमकीत चार लोक ठार झाले आहेत.  यावर ममता बॅनर्जी यांनी  प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळते आहे.(Mamata Banerjee Reacts On koch bihar Violence)

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरच आक्षेप घेतला आहे. 'एवढ्या लोकांना मारल्यानंतर सुद्धा  स्वसंरक्षणार्थ गोळीबार झाला म्हणणाऱ्या निवडणूक आयोगाला खोट बोलताना लाज वाटली पाहिजे' अशा शब्दांत ममता बॅनर्जी यांनी या घटनेवर आपले मत व्यक्त केले. सीआयएसएफने मतदानासाठी रांगेत उभे असलेल्या लोकांवर गोळीबार केला आणि चौघांचा मृत्यू झाला असे म्हणत आपल्याला याबद्दल पुर्विपासूनच शंका होती असे ममता बॅनर्जी यांनी यावेळी सांगितले. आपल्यामागे जनाधार नाही हे भारतीय जनता पक्षाला कळून चुकल्यामुळेच ते अश्या प्रकारचे हल्ले घडवून आणत असल्याची गंभीर टीका ममता बॅनर्जी यांनी यावेळी केली आहे. 

दरम्यान, आनंद बर्मन नावाच्या युवकाला सितलकुचीच्या पठाणतुली भागात असलेल्या  बुथ क्रमांक 85 वर मतदान सुरु असताना बाहेर खेचत आणले गेले आणि त्या युवकाला गोळी घालून ठार करण्यात आले. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात हिंसा झाली असून त्यामध्ये ४ जण ठार झाल्याचे समजते आहे.  

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com