लग्नपत्रिका घेऊन कैदी तिसऱ्यांदा पोहोचला कोर्टात; न्यायमूर्ती म्हणाले- ''मग तुम्ही म्हणाल हनिमूनला जायचेय...''

Madhya Pradesh High Court Viral Video: एकदा कारागृहात गेल्यावर, कैदी फक्त न्यायालयाच्या आदेशानुसार बाहेर येऊ शकतो.
Madhya Pradesh High Court
Madhya Pradesh High CourtDainik Gomantak

Madhya Pradesh High Court Viral Video: एकदा कारागृहात गेल्यावर, कैदी फक्त न्यायालयाच्या आदेशानुसार बाहेर येऊ शकतो, मग तो कोणाच्या लग्नासाठी असो किंवा कोणाच्या अंत्यविधीसाठी. मात्र, खोट बोलून न्यायालयाची दिशाभूल करुन अनेक कैदी एकदा नव्हे तर अनेक वेळा तुरुंगातून बाहेर पडतात. अशातच तिसऱ्यांदा लग्नपत्रिका घेऊन कोर्टरुममध्ये पोहोचल्यावर कैद्याच्या वकिलाचा धूर्तपणा न्यायमूर्तींनी पकडला.

तो व्यक्ती तिसऱ्यांदा लग्नपत्रिका घेऊन आला

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये न्यायमूर्तींनी एका कैद्याचा धूर्तपणा तर पकडलाच पण त्याला दिलासा देण्यासही नकार दिला. व्हिडीओच्या सुरुवातीला न्यायमूर्ती वकिलाला विचारत आहेत की, जो व्यक्ती तुरुंगात आहे तो लग्न करणार आहे का?

Madhya Pradesh High Court
Madhya Pradesh High Court: 'संमतीने लैंगिक संबंध ठेवण्याचे वय 16 वर्षे असावे...' मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची केंद्राला शिफारस

तुरुंगात असताना त्याला लग्नाचे आमंत्रण मिळाले

दरम्यान, वकिल महोदयांचा उत्तरात होकार आल्यावर न्यायमूर्ती म्हणाले की, वाह..., किती होनहार मुलगा आहे तो! तुरुंगात शिक्षा भोगत असताना त्याला लग्नाचा प्रस्ताव आला. तुरुंगात असताना एखाद्या व्यक्तीला लग्नासाठी प्रस्ताव आल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? न्यायमूर्तींना सांगण्यात आले की, त्याचे लग्न यापूर्वी दोनदा ठरले होते. न्यायमूर्ती पुढे म्हणाले की, याचा अर्थ असा आहे की त्याने हे आधीच दोनदा न्यायालयाला सांगितले आहे. न्यायमूर्ती पुढे असेही म्हणाले की, हा खरा हिरा आहे, यापूर्वी त्याचे दोनदा लग्न ठरले आणि आता तिसऱ्यांदाही होणार आहे. त्यावर वकिलाने सांगितले की, आता लग्न ठरले आहे, आम्ही कार्डही फाइल केले आहे.

Madhya Pradesh High Court
Madhya Pradesh High Court Gwalior Bench: न्यायमूर्ती अधिकाऱ्यावर भडकले, 'तुम्ही शिपाई होण्यासही लायक नाही...'

आधी शिक्षा भोगा आणि मग लग्न करा, अशा कडक शब्दात न्यायमूर्तींनी सुनावले. लग्नानंतर तुम्हाला शिक्षा भोगावी लागेल? तुम्ही म्हणाल की लग्न झाले आहे आणि आता हनिमूनला जायचे आहे. न्यायमूर्तींचे हे म्हणणे ऐकून तिथे उपस्थितींना हसू आवरता आले नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com