हुक्का बारवर 'या' राज्याने बंदी घातली; 21 वर्षांखालील युवकांना मिळणार नाही सिगारेट

Karnataka Assembly: कर्नाटक विधानसभेने बुधवारी COTPA कायद्यात (सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने) दुरुस्ती करुन राज्यभरातील सर्व हुक्का बारवर बंदी आणली.
Karnataka Assembly Passes Bill To Ban Hookah Bars Sale Of Cigarettes
Karnataka Assembly Passes Bill To Ban Hookah Bars Sale Of CigarettesDainik Gomantak

Karnataka Assembly:

कर्नाटक विधानसभेने बुधवारी COTPA कायद्यात (सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने) दुरुस्ती करुन राज्यभरातील सर्व हुक्का बारवर बंदी घातली. राज्याने 21 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे.

दरम्यान, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या दोषींना एक ते तीन वर्षांचा तुरुंगवास आणि एक लाख रुपयांपर्यंतच्या दंडासह कडक दंडाची तरतूद आहे. अधिसूचनेनुसार, नागरिकांच्या (Citizens) आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि तंबाखूजन्य आजारांना प्रतिबंध करण्यासाठी विद्यमान सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायद्यात (COTPA) सुधारणा केल्यानंतर ही बंदी लागू करण्यात आली आहे.

हुक्का उत्पादनांच्या खरेदी-विक्रीवर बंदी

दरम्यान, एक मोठे पाऊल म्हणून कर्नाटक (Karnataka) सरकारने राज्यात हुक्का उत्पादनांच्या खरेदी आणि विक्रीवर बंदी घातली आहे. राज्यातील तरुणांचे आरोग्य लक्षात घेऊन हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी हुक्का बंदीची घोषणा केली. त्यांनी 7 फेब्रुवारी रोजी X (पूर्वीचे ट्विटर) वरील पोस्टमध्ये ही माहिती दिली होती. त्यात त्यांनी लिहिले की, "सार्वजनिक आरोग्य आणि तरुणांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने कर्नाटक सरकारने हुक्क्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे."

Karnataka Assembly Passes Bill To Ban Hookah Bars Sale Of Cigarettes
Karnataka Assembly: जगातील सर्वात मोठ्या पक्षाला विरोधी पक्षनेता मिळेना! विधनसभा अधिवेशनात भाजप विरोधी पक्षनेत्याविना

दरम्यान, सुधारित विधेयक सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालते, धूरमुक्त वातावरण निर्माण करण्याच्या वचनबद्धतेवर जोर देते.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल

COPTA (सिगारेट आणि तंबाखू उत्पादने कायदा 2003), बाल संगोपन आणि संरक्षण कायदा 2015, अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता कायदा 2006, कर्नाटक विष (ताबा आणि विक्री) नियम 2015 अंतर्गत उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याचे कर्नाटक सरकारचे म्हणणे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com