Chattisgarh Naxal Attack: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह घटनास्थळी भेट देणार; गृहविभागाकडून मोठ्या कारवाईचे संकेत

amit shah 1.jpg
amit shah 1.jpg

शनिवारी छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये  सीआरपीएफ जवानांवर झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात 22 जवान शहीद झाले तर 32 जवान जखमी झाले आहेत. या घटनेनंतर गृह मंत्रालय कठोर कारवाई करण्याची तयारी करताना दिसते आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नक्षलवाद्यांविरूद्ध निर्णायक लढा देण्यासाठी रणनीती आखली जात असल्याची माहिती  आहे. दाट जंगलांच्या मध्यभागी असणाऱ्या नक्षलवाद्यांचे  आश्रयस्थान उद्धवस्त करून या संघटनेला संपूर्णपणे नष्ट करणे हे या कारवाईचे उद्दिष्ट असणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेऊन व पुढील धोरण निश्चित करण्यासाठी चर्चा केली असल्याचे समजते आहे. (Indications that the Union Home Department will take major action against the Naxalites)

आसाम मधील निवडणुकांचा अंतिम टप्प्यातील प्रचार सुरु असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे प्रचार दौऱ्यांत व्यस्त होते. मात्र छत्तीसगड मध्ये झालेल्या या गंभीर घटनेनंतर दौरा सोडून गृहमंत्री काल तातडीने दिल्लीत परतले. दिल्लीतील आपल्या निवासस्थानी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून अमित शाह यांनी घटनेचा आढावा  घेतल्याचे समजते आहे. आसाम, केरळ आणि तामिळनाडूच्या निवडणूका संपताच मोठ्या प्रमाणात सैन्य पाठवून छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्याची गृहविभाग  तयारी करत असल्याची माहिती  मिळते आहे. गृहमंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई होणार असल्याचे संकेत सुद्धा मिळताना दिसता आहेत.  

नक्षलवादी हल्ल्यात (Naxal Attack) जवान शहीद  झाल्याची माहिती मिळताच अमित शाह (Amit Shah) यांनी तात्काळ छत्तीसगडचे (Chattisgarh) मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांच्याशी संपर्क करून नक्षलवाद्यांविरूद्धच्या कारवाईत केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले आहे. तसेच त्यांनी सीआरपीएफचे (CRPF) महासंचालक कुलदीप सिंग यांना तत्काळ छत्तीसगडला जाऊन परिस्थितीची पाहणी करण्याचे आदेश देखील दिले होते. दुर्दैवाने आपलॆ जवान शहिद झाले असले तरी, सुरक्षा यंत्रणा कुठेही कमी पडल्या नव्हत्या हे कुलदीप सिंग यांनी या घटनेचा आढावा घेऊन स्पष्ट केले आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com