
INS Vagir Submarine Indian Navy: भारतीय नौदलात सहा स्कॉर्पीन फ्रेंच पानबुड्यांपैकी पाचवी पाणबुडी आयएनएस वागीर ही आज दाखल होणार आहे. यामुळे भारतीय नौदलाची ताकद वाढणार आहे. आयएनएस वागीर पाणबुडी ही सायलेंट किलर म्हणून ओळखली जाणार आहे.
स्कॉर्पियन डिझाइन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली 'आयएनएस वागीर' ही भारतीय बनावटीची पाणबुडी आहे. याची निर्मिती मुंबईतील (Mumbai) माझगाव डॉक येथे करण्यात आली आहे. ही पाणबुडी कलवारी वर्गाची पाचवी पाणबुडी भारतीय नौदलाच्या 'प्रोजेक्ट 75' अंतर्गत आतापर्यंत कलावरी श्रेणीतील 4 पाणबुड्या बांधण्यात आल्या असून त्या नौदलाला सुपूर्द करण्यात आल्या आहेत. नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार यांची प्रमुख उपस्थितीत ही पाणबुडी नौदलात (Navy) दाखल होणार आहे.
आयएनएस वागीर' पाणबुडीची वैशिष्ट्ये
ही पाणबुडी शत्रूला चकवा देणे आणि हल्ला करण्यात सक्षम आहे. शत्रूला कल्पनाही न येता ही पाणबुडी शांततेत आपले लक्ष उद्ध्वस्त करू शकते. ही पाणबुडी डिझेल तसेच इलेक्ट्रिकवर चालत असून समुद्रात भूसुरुंग टाकण्यास ही पाणबुडी सक्षम आहे.
ही समुद्रात तब्बल 350 मीटर खोलवर जाऊ शकते. तसेच अनेक महीने ती पाण्याखाली राहू शकते. ही पाणबुडी स्टेल्थ प्रकारातील असून ती शत्रूच्या रडारला देखील चकवा देऊ शकते. या पणबुडत अत्याधुनिक जहाजविरोधी क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आली असून ही पाणबुडी शत्रूला शोधून अचूक तिचा अचूक वेध घेऊ शकते
काय आहे प्रोजेत 75 ?
'आयएनएस वागीर' ही 'प्रोजेक्ट 75, यार्ड 11875 अंतर्गत बनवण्यात आली आहे. या प्रकल्पा अंतर्गत 6 पणबुड्या तयार केल्या जाणार आहेत. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या (MDL) कान्होजी आंग्रे येथे याची बांधणी सुरू आहे. या पूर्वी चार पणबुड्या या नौदलाल या प्रोजेक्ट अंतर्गत देण्यात आल्या आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.