रामदेव बाबांना 'ते' वक्तव्य भोवणार? IMA ने केंद्राकडे केली कारवाईची मागणी

ram dev baba.jpg
ram dev baba.jpg

योग गुरू रामदेव बाबा (Yog guru Ramdev) यांनी अ‍ॅलोपॅथीबद्दल (Allopathy) बेजबाबदार विधान केल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Central Ministry of Health) यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे. महामारी रोग अधिनियमांतर्गत योगगुरू रामदेव यांच्यावर खटला चालविला जावा. कारण अशिक्षित विधाने हा देशातील सुशिक्षित समाजासाठी धोका आहे. तसेच त्याचवेळी गरीब लोक त्याला बळी जात असल्याचे डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने एका निवेदनात म्हटले आहे. "अ‍ॅलोपॅथी एक मूर्ख आणि दिवाळखोर विज्ञान आहे." असेही रामदेव बाबा म्हणाले असल्याचा आरोप सोशल मीडियावरील एका व्हिडिओचा संदर्भ देत इंडियन मेडीकल असोसिएशनने (Indian Medical Association) केला आहे. (IMA demanded action on the statement made by Ramdev Baba)

ड्रग कंट्रोतर जनरल ऑफ इंडियाने (Drug controller general of india) स्वीकृत केलेले कोविड-19 (Covid-19) वरील रेमडेसिविर, फैविफ्लू  या आणि इतर सर्व औषधी अपयशी ठरल्या आहेत असेही विधान रामदेव यांनी केल्याच त्यांनी म्हटले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री स्वतः एक अ‍ॅलोपॅथीक डॉक्टर राहिले आहेत. त्यांनी या विषयाची गंभीर दखल घेऊन योगगुरू रामदेव यांच्यावर गुन्हादाखल करा अशी मागणी आयएएमने केली आहे. 

योग गुरु रामदेव सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेत असून, लोकांमध्ये भीती पसरवण्याचे काम करत आहेत. बेकायदेशीररित्या तयार केले गेलेले आणि  मान्यता न मिळालेले आपले औषध विकण्यासाठी रामदेव बाबा हा सर्व खटाटोप करत असल्याचा आरोप सुद्धा आयएएमने केला आहे.  तसेच जर केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांनी राम देव यांच्यावर कारवाई न केल्यास आपल्याला लोकतांत्रिक मार्गांचा वापर करावा लागेल, त्यासाठी आम्ही न्यायालयात देखील जाऊ असे मत आयएएमने व्यक्त केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com