Chattisgarh Naxal Attack: तीन ट्रॅक्टर मधून नेण्यात आले नक्षलवाद्यांचे मृतदेह; सीआरपीएफच्या डीजी यांची माहिती

kuldeep singh.jpg
kuldeep singh.jpg

शनिवारी छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 22 जवान शहिद झाले असून, 31 जवान जखमी झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेची गंभीर दखल घेत सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंग यांना घटनेची चौकशी आणि इतर कारवाई करण्यासाठी छत्तीसगडमध्ये जाण्याचे आदेश दिले होते. डीजी कुलदीप सिंग यांनी या प्रकरणाची माहिती घेऊन या घटनेत इंटेलिजन्स आणि योजना आखण्यात सुरक्षा यंत्रणा कुठेही कमी पडली नसल्याचे स्पष्ट केले आहे. (CRPF Director General kuldeep Singh said, No operational and intellectual failure in Chattisgarh ) 

नक्षलवादी हल्ल्यानंतर झालेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी छत्तीसगडमध्ये असलेले केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) महासंचालक कुलदीप सिंग यांनी रविवारी या कारवाईत कोणतीही गुप्तहेर वा कार्यवाही अपयशी ठरली नसल्याचे सांगितले आहे. तसेच या घटनेनंतर नक्षलवाद्यांनी मृतदेह वाहून नेण्यासाठी तीन ट्रॅक्टर वापरले असल्याचे  समजते आहे, त्यावरून हे स्पष्ट होते की जवळपास 25-30 नक्षलवादीही ठार झाले आहेत. मात्र आता पर्यंत त्यांची संख्या समोर आलेली नाही, अशी माहिती सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंग यांनी माध्यमांना  दिली आहे. 

दरम्यान, या घटनेनंर केंद्र सरकारच्या गृहविभागाने गंभीर दखल घेतल्याचे दिसून आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आसाममधील प्रचार दौरा सोडून तातडीने दिल्ली गाठली. दिल्लीतील आपल्या निवासस्थानी अमित शाह यांनी सुरक्षा यंत्रणांच्या महत्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून चर्चा केली. गृहसचिव अजय भाल्ला, संचालक आयबी अरविंद कुमार आणि सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारीही बैठकीस उपस्थित होते. नक्षलवाद्यांसोबत झालेल्या या चकमकीत शहिद झालेल्या जवानांबद्दल बोलताना अमित शाह यांनी  'या घटनेतील शहिद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही' असे म्हणत शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com