पैशाला हात न लावता चोरट्यांनी पळवली कोरोना लस

The vaccine was stolen by thieves without any money
The vaccine was stolen by thieves without any money

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. केंद्र सरकारने नुकताच 18 वर्षावरील सर्वांना कोरोनाची लस देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या 1 मे पासून देशभर कोरोना लसींची मागणी वाढणार हे नक्की!  याच पाश्वभूमीवर कोरोना लसींची गरज कशी भागवायची, याचं नियोजन प्रशासनाकडून सुरु असताना आता चोरट्यांची नजर कोरोनाच्या लसींकडे वळली आहे. हरियाणामधील एका रुग्णालयातून असाच एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयामधून चोरट्यांनी चक्क कोरोना लसींचा साठा गायब केला आहे. एकूण 1710 लसींचे डोस चोरी करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पैसे किंवा इतर कोणत्याही मेडिसीनला हात लावला नसल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे. त्यामुळे लसींच्या वाढत्या मागणीमुळे लसींची चोरी होण्याच्या घटना देखील समोर येऊ लागल्या आहेत. (The corona vaccine was stolen by thieves without any money)

हरियाणामधील जिंद पीपी सेंटर जनरल हॉस्पिटलमधला हा प्रकार समोर आला आहे. संपूर्ण जिल्ह्यासाठीचा कोरोना लसींचा साठा या रुग्णालयामध्ये ठेवण्यात आला होता. मात्र, रुग्णालयाच्या स्टोअररुमजवळ सीसीटीव्ही किंवा सुरक्षारक्षक अशी सुरक्षेची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे चोरट्यांना कोरोना लसींची चोरी करणं सोपं ठरलं, चोरांनी या चोरीदरम्यान स्टोअररुममधल्या इतर कोणत्याही औषधाला किंवा तिथे असणाऱ्या रकमेला हात  लावल्याचं दिसून आलं नाही. त्यामुळे फक्त कोरोना लसींची चोरी करण्याच्या हेतूनेच चोरटे इथे आल्याचा अंदाज पोलिसांनी लावला आहे. देशभरात अनेक ठिकाणी कोरोना लसींचे डोस वाया जात आहेत. या वाया जाण्यामध्ये हरियाणा राज्याचा देशात दुसरा क्रमांक लागतो, तर पंजाब राज्याचा तिसरा क्रमांक लागतो. 
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com