Uttar Pradesh: 'तो यूपीमधून मुलांचे अपहरण करुन...', मानवी तस्कराच्या कबुलीने उडाली खळबळ

Valsad Police: लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केल्यानंतर गुजरातमधील वलसाड पोलीस मानवी तस्करीच्या मोठ्या कटाचा तपास करत आहेत.
Arrested
ArrestedDainik Gomantak

Valsad Police: लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केल्यानंतर गुजरातमधील वलसाड पोलीस मानवी तस्करीच्या मोठ्या कटाचा तपास करत आहेत. चौकशीत आरोपीने यापूर्वी उत्तर प्रदेशातून 3 ते 4 मुलांचे अपहरण केल्याची कबुली दिली, त्यानंतर एकच खळबळ उडाली.

वलसाडचे जिल्हा पोलीस अधीक्षक राजदीप सिंग झाला यांनी सांगितले की, आरोपी रमेश नेपाळी याने पोलीस कोठडीत असताना उत्तर प्रदेशातून मुलांचे अपहरण करुन नेपाळमध्ये त्यांची विक्री केल्याची कबुली दिली.

डुंगरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मुलीचे अपहरण झाले होते

आरोपींच्या कबुलीनंतर वलसाड पोलिसांनी (Police) याबाबत उत्तर प्रदेश पोलिसांना माहिती देऊन मानवी तस्करीच्या मोठ्या गुन्ह्याचा तपास सुरु केला. 9 फेब्रुवारीला आरोपींनी गुजरातमधील डुंगरा पोलीस स्टेशन परिसरातून 6 वर्षाच्या मुलीचे अपहरण केले होते.

गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे वलसाड पोलिसांनी आरोपी रमेश नेपाळीला मध्य प्रदेशातून 24 तासांत ताब्यात घेतले. गुन्हा केल्यानंतर आरोपी रमेश नेपाळला जात होता.

Arrested
Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये भीषण अपघात, 17 जण जखमी

'तो मुलांना बिस्किटे, चॉकलेट देऊन आमिष दाखवायचा'

रमेश नेपाळीबद्दल माहिती देताना राजदीपसिंग जाला यांनी सांगितले की, आरोपी (Accused) बांधकामाच्या ठिकाणी काम करताना सापळा रचायचा आणि लहान मुलांशी नियमित चॉकलेट किंवा बिस्किटे देऊन मैत्री करायचा. मुलाची ओळख झाल्यावर तो त्याला जत्रेत नेण्याचे आमिष दाखवून पळवून नेत असे. घटनेदरम्यान त्याने अशा मार्गांचा वापर केला जिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नव्हते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com