Brij Bhushan Sharan Singh: ब्रिजभूषण शरण सिंह यांना मोठा झटका; कोर्टाने लैंगिक छळाचे आरोप केले निश्चित

Delhi Rouse Avenue Court: भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने लैंगिक छळाचे आरोप निश्चित केले आहेत.
Brij Bhushan Sharan Singh
Brij Bhushan Sharan SinghDainik Gomantak.

Brij Bhushan Sharan Singh: भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने लैंगिक छळाचे आरोप निश्चित केले आहेत. बृजभूषण शरण सिंह यांच्यावर सहा महिला कुस्तीपटूंनी छळ केल्याचा आरोप केला होता. दरम्यान, न्यायालयाने आपल्या निर्णयात लैंगिक छळ प्रकरणात आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले. कैसरगंजचे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कलम 354, 506 आणि इतर कलमांखाली आरोप निश्चित करण्यात आले आहेत. लैंगिक शोषणाच्या आरोपांचा तपास करत असलेल्या दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात जून 2023 मध्ये आरोपपत्र दाखल केले होते.

दरम्यान, दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने ब्रिजभूषण यांचे सचिव विनोद तोमर यांच्यावरही आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले. ब्रिजभूषण यांच्यावर आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे न्यायालयाने म्हटले. न्यायालयाने या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी 21 मेची तारीख निश्चित केली आहे. लैंगिक छळ प्रकरणाचा तपास करत असलेल्या दिल्ली पोलिसांनी 15 जून 2023 रोजी ब्रिजभूषण सिंग यांच्याविरुद्ध कलम 354, 354-ए आणि 354-डी आणि कलम 506 अंतर्गत आरोपपत्र दाखल केले होते. यापूर्वीच्या सुनावणीदरम्यान ब्रिजभूषण शरण सिंह यांनी काही तथ्ये न्यायालयाला दिली होती आणि त्यावर विचार करण्याची विनंती केली होती.

Brij Bhushan Sharan Singh
Brij Bhushan Sharan Singh: कुस्तीपटूंवरील लैंगिक छळ प्रकरणी बृजभूषण शरण सिंह यांना अंतरिम जामीन, 20 जुलैला पुढील सुनावणी

ही कलमे कधी लावली जातात?

जर एखाद्या महिलेवर हल्ला झाला किंवा तिच्या प्रतिष्ठेचा अपमान करण्याच्या उद्देशाने बळाचा वापर केला गेला, तर अशा प्रकरणात कलम 354 लागू केले जाते. त्याचवेळी, लैंगिक छळासाठी कलम 354-अ आणि गुन्हेगारी धमकीसाठी कलम 506 लागू केले आहे. कलम 354-डी चा वापर पाठलाग केल्याच्या आरोपात केला जातो. न्यायालयाने विनोद तोमर यांच्यावर कलम 506 (1) अंतर्गत आरोप निश्चित केले आहेत. विनोद तोमर यांच्यावर आरोप निश्चित करण्यासाठी पुरावे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com