आजपासून भाजपची दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक; पंतप्रधान मोदीही राहणार उपस्थित

आजपासून सुरू होणाऱ्या भाजपच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सहभागी होणार आहेत.
PM Narendra Modi
PM Narendra ModiDainik Gomantak

भारतीय जनता पक्षाची (BJP) आजपासून हैदराबादमध्ये (Hyderabad) राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक पार पडणार आहे. आजपासून सुरू होणाऱ्या भाजपच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देखील सहभागी होणार आहेत. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक हैदराबाद येथील तेलंगणा येथे 2 आणि 3 जुलै रोजी होणार आहे. (BJP's Two-Day National Executive Meeting)

तेलंगणा भाजपचे प्रवक्ते एनव्ही सुभाष यांनी माध्यमांना सांगितले की, 18 वर्षांनंतर हैदराबादमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीचे आयोजन करण्यात येणार आहे. यानिमित्ताने शहर देखील सजवण्यात आले आहे. राष्ट्रीय नेते, मुख्यमंत्री आणि इतर 119 नेते 3 जुलै रोजी मोठी जाहीर सभा होणार असलेल्या मतदारसंघांना भेट देणार आहेत.

भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार, पक्षाचा विस्तार हा या बैठकीचा मुख्य अजेंडा असणार आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अधिक लोकांना सहभागी करून घेण्याची गरज असलेल्या भागातही ते चर्चा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. याशिवाय बैठकीनंतर फोटो प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात येणार असून, त्यामध्ये ज्येष्ठ नेत्यांचे फोटो आणि यापूर्वी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठका आणि महत्त्वाच्या घटना पाहायला मिळणार आहेत.

याआधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (J.P Nadda) यांनी शुक्रवारी (01 जुलै) हैदराबादमध्ये पक्षाच्या सरचिटणीसांची बैठक घेतली होती. हैदराबाद इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर (HICC) येथे ही बैठक झाली होती. नड्डा यांनी हैदराबादला येताच मेगा रोड शो देखील केला होता.

रोड शोनंतर नड्डा यांनी ट्विटरवर लिहिले की, "आज हैदराबादमध्ये या रोड शोचे नेतृत्व करणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे कारण यामुळे मला माझ्या समर्पित कार्यकर्त्यांच्या आणि शहरातील लोकांच्या आसपास राहण्याची एक संधी मिळाली आहे. मी पाहिलेले प्रेम आणि आपुलकी भाजपची निर्विवादपणे वाढणारी उपस्थिती दर्शवते आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com