शेतकरी आंदोलनाला उतरती कळा, का शेतकऱ्यांची नवी रणनिती ?

Are the farmers forming new strategy for the protest against farm laws
Are the farmers forming new strategy for the protest against farm laws

नवी दिल्ली : नवीन कृषी कायद्यांच्या विरोधातील शेतकरी आंदोलनाचा आज 83 वा दिवस. बरेच शेतकरी आपापल्या खेड्यात परतले आहेत. गेल्या महिन्याभरात दिल्लीच्या सीमेवर जेवढे शेतकरी आंदोलन करत होते,त्यांची संख्या आता बरीच कमी झाली आहे. ही कमी होणारी संख्या म्हणजे शेतकरी आंदोलन कमकुवत होणे नाही, तर हा शेतकऱ्यांच्या एका रणनितीचा भाग असल्याची चर्चा आहे.

बऱ्याच राज्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी देशभरातील महापंचायतींची योजना आखली आहे. येत्या 10 दिवसांत ते हरियाणा, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये अशा सभांमध्ये सहभागी होणार आहेत.

कोणाही माघार घ्यायला तयार नाही

गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून सरकार आणि शेतकरी यांच्यात हा सामना सुरू आहे. कोणतीही बाजू पाऊल मागे घ्यायला तयार नाही. वाटाघाटी सुरू असताना हे कृषी  कायदे 18 महिन्यांकरिता स्थगित करण्याचा सरकारचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी नाकारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा प्रस्ताव अद्यापही खुला असल्याचे म्हटले आहे. शेतकरी नेते राकेश म्हणाले, "जर इथं 10 लाख लोक जमले तर सरकार हे कायदे मागे घेईल? आम्ही देशभर आंदोलन करू. आमचे लोक सर्व जिल्ह्यात पसरत आहेत. सभा होत आहेत. आम्ही हो आंदोलन यशस्वी करू दाखवू, त्याशिवाय हार मानणार नाही."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com